एक्स्प्लोर

Nitin Deshmukh: भाजप म्हणजे, इतरांच्या मदतीनं बाळ जन्माला घालण्याचा प्रकार; नितीन देशमुखांची टीका

Nitin Deshmukh : आपण मूल जन्माला आणू शकत नाही म्हणून दुसऱ्याच्या हाताने बाळ जन्माला आणण्याचा हा प्रकार असल्याची घाणाघाती टीका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर केली आहे.

Nitin Deshmukh अकोला: येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) जे आमदार, खासदार निवडून येतील ते सगळे काँग्रेसच्या (Congress) विचारधाराचे आणि इतर वेगळ्यावेगळ्या विचारधाराचे दिसतील. भाजपच्या (BJP) विचारधारेने लोक कुठल्याही परिस्थितीत निवडून येत नसल्याने, त्यांनी आता दुसऱ्या इतर पक्षातून लोकांना आपल्या पक्षात आयात करण्याचे उद्योग चालवले आहे. हे म्हणजे आपण मूल जन्माला आणू शकत नाही म्हणून, दुसऱ्याच्या हाताने बाळ जन्माला घालण्याचा हा प्रकार असल्याची घाणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी भाजपवर केली आहे.

भाजपला काँग्रेसच्याच विचारधारेवर चालावे लागेल

एखादा माणूस कुठल्या विचारधारेचा असल्यावर तो कुठल्याही पक्षात गेला तरी त्याची विचारधारा बदलत नसते. म्हणजे आता जे इतर पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत ते जर निवडून आले, तर हे निवडून येणारे लोक असतील त्यांची विचारधारा ही त्या त्या पक्षाची विचारधारा असेल. ती भाजपची विचारधारा कधीही होऊ शकत नाही. भविष्यात भाजपला काँग्रेसच्याच विचारधारेवर चालावे लागेल, असे एकंदरीत परिस्थिती निर्माण होणार असल्याचे देखील आमदार नितीन देशमुख म्हणाले.

कुठलाही नेत्याचे अशा पद्धतीने पक्षातून निघून जाण्याने पक्षाला फार काही परिणाम होत नाही. शेवटी कुठलाही नेता ही जनता घडवत असते. जनता ज्यांच्या सोबत असते, तोच खरा नेता ठरत असतो. त्यामुळे ज्याच्यासोबत जनता नाही तो कधीही नेता होऊ शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला किंवा कुठल्या पक्षाला याचा कुठलाही फरक पडणार नाही, असे देखील देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही होतेय. 

गेल्या 24 तासांत अशोक चव्हाणांच्या हालचाली (काँग्रेस सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार)

  • शनिवार-रविवार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत प्रदेश कार्यालयात बैठका होत्या
  • रविवारी दुपारी 12 वाजता चेन्निथला यांच्यासोबत बैठकीला अशोक चव्हाण पोहचले.
  • त्यानंतर तासभर चेन्निथला यांच्यासोबत बैठक झाली आणि बैठकीतून बाहेर पड़ून दुपारी तीन पर्यंत अशोक चव्हाण टिळकभवनमध्ये बसून होते
  • सकाळी 8 वाजता – राहुल नार्वेकरांची भेट घेतली
  • सकाळी 11  वाजून 24 मिनिटांनी - आमदारकीचा राजीनामा दिला
  • दुपारी 12.15 वाजता – राजीनाम्याची प्रत त्यांच्या मदतनीसाने प्रदेश कार्यालयात आणून दिली
  • दुपारी 1.45 वाजता - अशोक चव्हाणांची ट्विटरवरून राजीनाम्याची घोषणा

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
Chhagan Bhujbal : गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सTelangana Rain : तेलंगणामध्ये पावसाचा कहर; 29 जणांचा जीव गेला,रेवंथ रेड्डींनी बोलावली आढावा बैठकSalman Khan Ganpati Bappa : सलमान खानच्या घरच्या बाप्पाचं आज विसर्जनABP Majha Headlines :  8  AM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
Chhagan Bhujbal : गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Embed widget