Vidhan Parishad Election 2021 : तणाव, राडा ते विजयाचा दावा; अकोला-बुलडाणा विधानपरिषदेसाठी चुरशीने 98 टक्के मतदान
Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं मतदान आज पार पडलं.
Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं मतदान आज पार पडलं. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून वसंत खंडेलवाल रिंगणात आहेत. या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातून 821 मतदार आहेत. 14 डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांतून एकूण मतदान् 98.30 टक्के मतदान झालंय. तीन जिल्ह्यातील एकूण 822 पैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यात अकोट, तेल्हारा ,बाळापूर ,पातूर, मुर्तीजापुर ,वाशिम ,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, देऊळगाव राजा ,सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, आणि नांदुरा येथे 100% मतदान झाला आहेय. तर अकोला शहरात 99.29 %, बुलढाणा शहरात 99.02 %, शेगाव मध्ये 93.75 %, मलकापूर येथे 84.38 %, तर सर्वात कमी मतदान बार्शिटाकळी येथे 75% झाला आहेय.. आज पार पडलेल्या मतदानात 822 मतदार पैकी 808 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून मतांची मोजणी अकोल्यात 14 डिसेंबरला होणार आहे.
मतदानातून भाजपनं दाखवली 'एकी' :
अकोल्यात पहिले पावणेदोन तास एकही मतदान झालं नाही. सकाळी पावणदहा वाजता अकोल्याचे सर्व मतदार जत्थ्याने आलेत. तासभरात भाजपनं आपलं सर्व मतदान करून घेतलं. याप्रकारे भाजपनं एकत्र मतदान करीत दाखवली एकी.
'महाविकास आघाडी'च्या मतदारांचं एकत्र मतदान :
भाजपचं मतदान झाल्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार बसने मतदान केंद्रावर आले होते. सर्वांनी एकत्र मतदान केलं.
अकोल्यातील मतदान केंद्रावर भाजप-सेनेत बाचाबाची, शिवीगाळ :
अकोल्याच्या मतदान केंद्रावर शिवसेना उमेदवार आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात प्रचंड वाद झालेय. अकोल्यातील बी. आर. हायस्कूल मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय. यावेळी आमदार बाजोरिया आणि भाजपचे विजय अग्रवाल एकमेकांच्या अंगावर धावून गेलेय. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आलेय. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हाणामारीची घटना टळलीय. यानंतर मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय.
खासदार अरविंद सावंत यांनी निवळलं तणावाचं वातावरण :
अकोल्याच्या मतदान केंद्रावर शिवसेना-भाजपाच्या नेत्यांमध्यो शाब्दीक बाचाबाची आणि राडा झाला होताय. शहरातील बी. आर. हायस्कूल मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय. शिवसेना उमेदवार आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात हा वाद झालाय. यावेळीएकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय. मात्र, या घटनेनंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत मतदान केंद्रावर आलेय. खासदार सावंत मतदान केंद्रावर आल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच हास्यविनोद रंगलाय. खासदार सावंतांनी गमतीत भाजप उमेदवार गोपीकिशन बाजोरियांना दस नंबरी म्हटलेय. तर ज्यांच्यासोबत आमदार बाजोरियांचा वाद झालाय ते भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल एक नंबरी असल्याच विनोद केलाय.
दोन्ही उमेदवारांचे विजयाचे दावे :
या निवडणुकीत आपण विजयी होणार असल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केलाय. ते चौथ्यांदा येथून रिंगणात आहेत. तर भाजपच्या वसंत खंडेलवालांनी बाजोरियांची मतदारसंघावरील मक्तेदारी मोडीत काढत विजयाचा दावा केलाय.
बुलडाणा आणि वाशिममध्येही मतदान शांततेत :
अकोल्यातील भाजप-सेनेतील बाचाबाचीचा अपवाद वगळला तर वाशिम आणि बुलडाण्यात मतदान शांततेत पार पडलंय.