एक्स्प्लोर

महायुतीत ठिणगी? अजित पवारांबरोबर झालेली युती म्हणजे 'असंगाशी संग', भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी आहे. हा असंगाशी संग केला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांनी केलं आहे.

Maharashtra Politicis News: विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी आहे. हा असंगाशी संग केला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांनी केलं आहे. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यामुळं महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

लोकसभेला आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत

लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचे गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग आमच्यासोबत घडवला आहे असं हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं देखीवल महत्वाचं ठरणार आहे. कारण मागील दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी ताँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

आमच्या खासदारांना पाडण्याचं काम राष्ट्रवादीने केलं

सध्या अजित पवार गटाचे बाबासाहे पाटील हे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का? असे म्हणत तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम केल्याचा आरोप यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते नगरसेवक बसत होते. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?.असा सवाल हाके यांनी केला. 

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद यात्रा

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपाध्यक्ष अशोक केद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. तसेच अहमदपुरात विधानसभेसाठी शड्डू देखील ठोकला आहे.

महत्वाच्या बातम्या:

तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, मिटकरींचा हल्लाबोल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 04 PM 18 September 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यताABP Majha Headlines : 03 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Kadambari Jethwani : तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री  घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका
महाराष्ट्र वाऱ्यावर? नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका
Pune Ganpati Visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणूक एकदाची संपली, 28 तास पोलिसांची कसोटी, शेवटचा गणपती अलका चौकातून  मार्गस्थ
पुण्यातील विसर्जन मिरवणूक एकदाची संपली, 28 तास पोलिसांची कसोटी, शेवटचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ
Success story:हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती
हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती
Embed widget