मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्या दिशने निघाले, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींचा अंदाज
Ajit Pawar Update : मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्या दिशने निघाले आहे.
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मोठा राजकीय भूकंप करण्याची शक्यता आहे. 1 जुलैपर्यंत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा राजीनामा घेऊन आपल्याला प्रदेशाध्यक्ष करावं अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती, मात्र ती शरद पवारांनी मान्य न झाल्याने अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अजित पवार विरोधी पक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांनी आपल्या सर्व समर्थक आमदाराला मुंबईत बोलवलं आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्या दिशने निघाले असून, सध्या नाशिकपर्यंत पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विधानसभा अध्यक्ष नसल्यामुळे अजित पवार राज्यपालाकडे राजीनामा देऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.