एक्स्प्लोर
वेळात वेळ काढून दादा-ताईंचा इमरती आणि भजीवर ताव
अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी अचानक औरंगाबादेतील प्रसिद्ध असलेली इमरती आणि भजी खाण्यासाठी औरंगाबादेतल्या जुन्या भागात गेली.

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे बहीण-भाऊ आज औरंगाबादमध्ये आज एका आगळ्या वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळाले. संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते औरंगाबादेत आहेत. यावेळी त्यांची गाडी अचानक औरंगाबादेतील प्रसिद्ध असलेली इमरती आणि भजी खाण्यासाठी औरंगाबादेतल्या जुन्या भागात गेली. उत्तम मिठाई या दुकानातली इमारती आणि भजी प्रसिद्ध आहेत. ही भजी खाण्यासाठी दोन्ही नेते उत्तम मिठाईमध्ये पोहोचले. सामान्य ग्राहकांप्रमाणे खुर्ची-टेबलवर बसून त्यांनी इमरती आणि भजीचा आस्वाद घेतला. दोघांनी भजी आणि इमरती जिलेबीवर ताव मारला. इतकंच नाही तर यावेळी सेल्फी घेत त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये फिरत असताना, त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेत असतो, शॉपिंग करत असतो. कामातून वेळ काढून त्या त्या शहराचा फेरफटका मारतो. तर अजितदादा म्हणाले, "तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तामझाम पाहायला मिळेल, तिथले पदार्थ उत्तम असतीलच असे नाही. पण उत्तम खाद्य हे छोट्या हॉटेलमध्ये, चांगला चहा हा टपरीवर मिळतो".
लोडशेडिंगचा फटका राज्यभरात कालपासून सुरू झालेल्या लोडशेडिंगचा फटका राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही बसला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सुभेदारी विश्रामगृहावर मुक्कामी होते. सुभेदारी विश्रामगृहात लाईट गेल्यामुळे या नेत्यांना रात्र लोडशेडींगमध्ये काढावी लागली.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये फिरत असताना, त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेत असतो, शॉपिंग करत असतो. कामातून वेळ काढून त्या त्या शहराचा फेरफटका मारतो. तर अजितदादा म्हणाले, "तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तामझाम पाहायला मिळेल, तिथले पदार्थ उत्तम असतीलच असे नाही. पण उत्तम खाद्य हे छोट्या हॉटेलमध्ये, चांगला चहा हा टपरीवर मिळतो".
लोडशेडिंगचा फटका राज्यभरात कालपासून सुरू झालेल्या लोडशेडिंगचा फटका राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही बसला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सुभेदारी विश्रामगृहावर मुक्कामी होते. सुभेदारी विश्रामगृहात लाईट गेल्यामुळे या नेत्यांना रात्र लोडशेडींगमध्ये काढावी लागली. आणखी वाचा