एक्स्प्लोर

Ajit pawar plane crash :  विमान अपघातात अजित पवार यांचं निधन, 10 महत्वाचे मुद्दे 

Ajit pawar plane crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात (Ajit Pawar Baramati Plane Crash)  मृत्यू झाला आहे.

Ajit pawar plane crash :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात (Ajit Pawar Baramati Plane Crash)  मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी 11 वाजता राजकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लँडिंगपूर्वी विमान अपघात

अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये उतरण्यापूर्वीच कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज अजित पवार हे बारामतीमध्ये तीन जाहीर सभांना उपस्थित राहणार होते. या अपघातानंतर लगेच सुरक्षा यंत्रणा, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर विमानातील आग विझवण्यात आली.

बारामती विमान अपघाताबद्दल 10 महत्त्वाचे मुद्दे 

1) दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सच्या लिअरजेट 46 या विमानाने अजित पवार सकाळी 8 वाजून 10 मिनीटांनी मुंबईहून उड्डाण केले होते. त्यानंतर सकाळी 8 वाजून 45 वाजता विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता.

2) डीजीसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या विमानात अजित पवार यांच्यासह पाच जण होते.

3) एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विमान सकाळी 8.50 वाजता कोसळले.

4) अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटवण्यात आली.

5) बारामती विमान अपघातात पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी यांचाही मृत्यू झाला आहे. विमान अपघाताचे कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल.

6) बारामतीमध्ये झालेल्या अपघातावेळी सुरक्षा रक्षक विदिप जाधव हे अजित पवारांसोबत उपस्थित होते. विदिप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला.

7) पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट करून अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.अजित पवार हे तळागाळातील नेते होते. एक कृतीशील माणूस म्हणून लोकांमध्ये त्यांचा आदर होता. त्यांचे जाणे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक असल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

8) अजित पवार यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे. पक्ष आणि कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही दोघांनीही एकत्र संकटांचा सामना केला आहे.

9) अजित पवार यांच्या निधनानंतर, महाराष्ट्र सरकारने आज सर्व राज्यस्तरीय कार्यक्रम रद्द केले आहेत. महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

10) बारामती विमान अपघाताची चौकशीची मागणी केली जात आहे. एएआयबी टीम विमान अपघात स्थळाला भेट देऊन चौकशी करणार आहे. ही टीम दिल्लीहून बारामतीला रवाना झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पार्थिव कुठं आणि कस ठेवणार? आज रात्री 10 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठान, उद्या सकाळी काटेवाडीत, विद्या प्रतिष्ठान मैदानात दादांना अखेरचा निरोप

 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget