एक्स्प्लोर

गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू : अजित पवार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची दखल घेतली आहे. पक्षविरोधी कृत्य करणाऱ्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यात मतदारांनी राष्ट्रवादीला स्पष्ट कौल दिला असतानाही पराभवाचा सामना करावा लागला, हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रिपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल. अशा पक्षविरोधी कारवाया कदापि सहन केल्या जाणार नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर शरसंधान साधलं आहे. सुरेश धस गटाची पंकजा मुंडेंना मदत बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेना आणि काँग्रेसच्या एका सदस्यानेही मदत केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं. काय आहे वाद? बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. विश्वासघातकी व्यक्तींमुळे बीड झेडपी राष्ट्रवादीच्या हातातून गेली, असंही धनंजय मुंडे म्हणाले. कमी जागा मिळालेल्या असताना भाजपने बीड जिल्हा परिषदेवर शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली आहे. 34 मतांसह भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 25 मतं मिळाली.

संबंधित बातम्या :

सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांचं भाजपला मतदान

तुमची झेडपी, तुमचा अध्यक्ष

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
Nagpur Cyber Crime: शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Embed widget