एक्स्प्लोर

महाविकास आघाडीने एकोप्याने राहायचं ठरवलंय, एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल : अजित पवार

महाविकास आघाडीने एकोप्याने राहायचं ठरवलंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील आम्ही देखील एकोप्याने राहतोय. पण हा एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.  

पुणे : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकोप्याने राहायचं ठरवलंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील आम्ही देखील एकोप्याने राहतोय. पण हा एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते. जिथं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना किंवा जिथं शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत झालीय तिथं एकत्र बसून प्रश्न सोडवावे लागतील.  रायगडमध्ये आम्ही मार्ग काढला. आमच्याकडून जयंत पाटील आणि मी आणि त्यांच्याकडून उद्वव ठाकरे मार्ग काढतील, असंही अजित पवार म्हणाले.  महापालिका निवडणुकीमधे प्रभाग रचना कशी असेल याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले. 

लॉकडाऊनसंदर्भात काय म्हणाले अजित पवार 
अनलॉकच्या गोंधळाबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar On Maharashtra Unlock) म्हणाले की, राज्याचे प्रमुख या नात्याने उद्वव ठाकरेंनी जो निर्णय लॉकडाऊनच्या बाबतीत घेतलाय तोच अंतिम आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे (Pune Pimpari Chinchwad Lockdown Unlock) निर्बंध शिथिल करण्याबाबत सोमवारी निर्णय घेणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा पॉझिटीव्हीटी रेट पाच टक्क्यांहून कमी आहे. मात्र इतर जिल्ह्याचा जास्त आहे. त्यामुळे वेगवेगळे निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले. दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन सोमवारी पुण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की त्यांचा एक शब्द चुकला. म्हणून तर आम्ही या फंदात जास्त पडत नाही, असा टोमणा त्यांनी मारला.

वारीसंदर्भात काय म्हणाले अजित पवार 
अजित पवार वारीसंदर्भात (Ajit Pawar on Pandharpur Wari) बोलताना म्हणाले की, आज वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. आम्ही वारकऱ्यांना पायी पालखी सोहळा साजरा करण्यातील अडचणी सांगितल्या. मात्र वारकऱ्यांनी 50 लोकांसह पायी वारी करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र एकदा पालखी निघाली की गर्दी होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलीय, असं ते म्हणाले. 

चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र
यावेळी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.  चंद्रकांत पाटलांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दादांनी सांगितलंय की ते कसे आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलच बरं. मी तर सारखा झोपेतून जागा होतो आणि चॅनल लावतो. हे चॅनल ते चॅनल आणि बघतो. पडलं पडलं पडलं असं ऐकायला मिळतं असं असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला तर फडणवीसांवर बोलताना म्हणाले की,  मी उद्धव ठाकरेंना सांगणार आहे की आपण फडणवीसांची शिकवणी लावू.  मी पण त्या शिकवणीला जाईन, असं अजित पवार म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray Group vs Congress : ठाकरे गट - काँग्रेसमध्ये जागांची अदलाबदल होणार?Ramtek Special Report  : रामटेकमध्ये रंगणार सांगली पॅटर्न? उमेदवारीवरून काँग्रेस-ठाकरे आमनेसामनेABP Majha Headlines :  7 AM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM :  25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Embed widget