एक्स्प्लोर

''लोकसभेला जिने मतदान केलं नाही, त्यांनाही अर्ज भरू द्या, लाडकी बहीण योजनेत पक्ष आणू नका''

महिला भगिंनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने 46 हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती देत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत

पुणे : राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) सध्या चांगलीच चर्चेत असून या योजनेला विरोध करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालायने या याचिकेवर आक्षेप घेत ही याचिका फेटाळून लावली आहे. दुसरीकडे राज्य सरकारमधील सर्वच मंत्री या योजनेची माहिती गावखेड्यापर्यंत पोहोचवताना दिसून येतात. राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील लाडकी बहीण योजनेची माहिती सातत्याने भाषणातून देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आज बारामतीत (Baramati) कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. लाडकी बहि‍ण योजनेसाठी अर्ज भरुन घेताना नीट वागा, इथं पक्ष आणू नका. लोकसभेला जिने मतदान केलं नाही, त्यांचाही अर्ज भरून घ्या, असे अजित पवार म्हणाले.  

महिला भगिंनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने 46 हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती देत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीत आपल्याला मतदान केलं नसेल, त्या महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरु द्या, अशा सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. ''लाडकी बहीण चुनावी जुमला म्हणून सांगितले, पण अशा योजना वेगवेगळ्या राज्यात राबिवल्या जातात. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कालांतराने वाढवले. सरकारला गरीब जनतेला मदत करायची आहे. पण त्यात लोकांची काही फसवणूक करू नका, कोणतीही योजना आणल्यावर काही त्रुटी राहतात. जिने आपल्याला लोकसभेला मतदान दिले नसले तरी तिला फॉर्म द्या, इथे पक्ष आणू नका,'' असे म्हणत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अर्ज भरुन घेताना कार्यकर्त्यांना अजित पवारांनी महत्त्वाची सूचना केली आहे. 

अन्यथा पक्षातून हकालपट्टी करेन

आचारसंहिता लागेपर्यंत जे कुणी फॉर्म येईल त्यांना जुलै,ऑगस्ट,सप्टेंबरचे पैसे मिळतील. काहीजण फॉर्म भरणाऱ्यांना तुसड्यासारख वागवत होते. अरे घरात आई-बहीण आहे का नाही? असं वागायचं असेल तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी येऊ नका. जर तुमचा मूड नसेल तर मूड नीट होईपर्यंत पब्लिकमध्ये येऊ नका. जर कुणी अस वागले तर मी पक्षातून हकालपट्टी करेल, असा दमही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच, गॅसच्या किमती वाढल्या की महिलांच्या कपाळावर आट्या पडायच्या, आता आम्ही 3 गॅसचे पैसे खात्यावर टाकणार आहोत. तर, ज्या आई वडिलांचे उतपन्न 8 लाखांच्या आत असेल त्यांच्या मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची योजना आणली. बहि‍णींना देतात भावांना काय?, वीज बिल भावांनाच आहे ना, उगीच विरोधक कांड्या पिकवतात, असे म्हणत सरकारच्या योजनांवर विरोध करणाऱ्यांनाही अजित पवारांनी टोला लगावला. 

कागदपत्रावर आईचे नावही येणार

आशा होती म्हणून अजित होऊ शकला, नुसतं अजित अनंतराव नाही, यापुढे अजित आशा अनंतराव पवार असं नाव लिहिण्याचा निर्णय घेतला. म्हणजे, मुला-मुलींच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये आईचं नाव बंधनकारक करण्यात आलंय, असेही अजित पवारांनी बारामतीमधील आपल्या भाषणातून सांगितले. 

महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न

आमच्यावर आरोप झाले की हे कारखाने राज्या बाहेर पाठवतात. पण, आता टोयोटा गाडी तयार करण्याचा कारखाना संभाजी नगरला होणार आहे. अनेक उद्योग आम्ही महाराष्ट्र मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, वाढवण बंदरात लोकांचा विरोध आहे. पण आम्ही त्यांना जास्त मोबदला देणार आहोत. देशात जेवढा जीएसटी जमा होतो, त्यातला 16 टक्के महाराष्ट्रात होतो, अशीही माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणातून दिली. 

हेही वाचा

माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, मला बदल करायचे आहेत; पवारांच्या बारामतीत अजित दादा गरजले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHATop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
×
Embed widget