एक्स्प्लोर

अजित पवारांचा भाजप सरकारवर घणाघात

पैसे नसताना कोट्यावधी रुपये खर्च करुन बुलेट ट्रेन आणायची गरजच काय आहे. पहिलं इतर सुविधा द्या मगच बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहा, असे अजित पवार म्हणाले. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमडमधील निर्धार यात्रेच्या सभेत बोलत होते.

पालघर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पैसे नसताना कोट्यावधी रुपये खर्च करुन बुलेट ट्रेन आणायची गरजच काय आहे. पहिलं इतर सुविधा द्या मगच बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहा, असे अजित पवार म्हणाले. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमडमधील निर्धार यात्रेच्या सभेत बोलत होते. भाजप सरकारला घरी बसवण्यासाठी आम्ही राज्यभर यात्रा काढत फिरत आहोत. हे सरकारला पायउतार केल पाहिजे. कारण यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. केंद्राचे पथक दुष्काळाची पाहणी करायला आले आणि घोड्यावर पाहणी करुण निघून गेले. शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम यांनी केलं नाही. शरद पवार यांनी जे शेतकऱ्यांसाठी केलं ते ही सरकार करु शकलं नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.आदिवासी आश्रम शाळेत बनावट वस्तुंचा पुरवठा करुन ते पैसे लुटायचं काम या सरकारने केलं, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर घणाघात केला. राज्यात दोन लाख जागा रिक्त असताना भरल्या जात नाहीत. ' मोठ घर पोकळ वासा, वारा जाई भसा-भसा,' अशा उपाहासात्मक शब्दात अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. 3 हजार कोटी खर्च करुन वल्लभभाईंचा पुतळा उभारण्यात आला, मात्र त्याची गरज काय? लोकांना फक्त भावनिक मुद्द्यांवर फसवण्याचं काम हे सरकार करत आहेत, असेही पवार म्हणाले. दादरी प्रकरणाचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले, काही लोकांना गोमांसच्या नावावर मारुन टाकतात आणि तपासानंतर म्हणतात ते मांस गाईचे नव्हते. अजून किती अत्याचार हे सरकार करणार आहे? असा सवाल अजित पवारांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget