एक्स्प्लोर

Breaking News : राष्ट्रवादीच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, सहा ते सात मंत्र्यांना दोन दिवसात जबाबदारी मिळण्याची शक्यता

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्रीपदासाठी दबाव वाढत असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

मुंबई: एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Ajit Pawar) पक्षाच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. पुढील दोन दिवसात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या सहा ते सात मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाच्या वाटपासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. 

महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येतंय. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटला नाही. सातारा, पुणे, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटासोबत अजित पवार गटही आग्रही असल्याचं कळतंय. अशातच अजित पवार गटाच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा केली. 

अजित पवार नाराज असल्याची चर्चा 

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळल्याचं दिसून आलं. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. अजित पवार आजारी असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्यांचं सांगण्यात येतंय.

अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांच्या गटाच्या मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. पण या बैठकीलाही अजित पवार उपस्थित नसल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर 

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे-फडणवीसही तातडीनं दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत शिंदे-फडणवीसांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. अजित पवार नाराज आहेत आणि पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचा दबाब वाढत चालला असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अचानक दिल्लीला रवाना झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावलेTop 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8.00AM TOP Headlines 08.00AM 12 February 2025Top 70 | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचा सत्कार, संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Stock Market Crash: केवळ पाच दिवसात 18 लाख कोटी स्वाहा, स्टॉक मार्केटमध्ये धूळधाण, शेअर मार्केट इतकं का पडलं?
शेअर मार्केटमध्ये लाल चिखल, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले, घसरणीची नेमकी कारणं कोणती?जाणून घ्या
Embed widget