Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश! अशा आशयाने त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. योजना किती महत्त्वपूर्ण आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी व्हिडिओमधून केला आहे.
Jayant Patil on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (4 जुलै) मांडलेला अर्थसंकल्प आज पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश! अशा आशयाने त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. योजना किती महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या किती लाभकारी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी व्हिडिओमधून केला आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.
ही इतिहासातील पहिलीच वेळ असेल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या व्हिडिओवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर व्हिडिओमधून जनतेला सांगावं लागेल लागत आहे, ही इतिहासातील पहिलीच वेळ असेल अशा खोचक शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी टीका केली.
कदाचित श्रेयवादाच्या लढाईसाठी अजित दादांना व्हिडिओ करावा लागला असेल, असे म्हणत पाटील यांनी अजितदादांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. ते पुढे म्हणाले की लोकसभेच्या निकालाचा कल लक्षात घेता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल. ज्यांनी बैलगाडी भरून पुरावे आणले आणि अजितदादांवर आरोप केले त्यांच्यासोबत आता असल्याने भविष्यात आरोप सिद्ध होणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवार व्हिडिओमध्ये काय म्हणतात?
माझ्या महाराष्ट्रवासीयांनो मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचा भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात तर मला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही, याची काळजी ती घेते. परंतु काही वेळा परिस्थितीशी अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडे दुर्लक्ष होतं. मात्र, आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसाहयाच्यामुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल.
राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावरती उभे राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की, आपण दैनंदिन गरजांसाठी वडील भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत. त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मलाही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवलेले आहे. एवढेच नाही तर राज्यातील माता-भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या