(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अपघात झालेला दिसला अन् अजितदादांनी ताफा थांबवला; दवाखान्यात पोहोचवलं, नंतर विचारपूसही केली
Ajit Pawar In Baramati : ताफा बारामतीच्या दिशेने निघाला आणि अचानक माळेगाव कॉलनी नजीक समोरच एक अपघात घडल्याचा अजित पवारांच्या नजरेस पडला. तात्काळ अजित पवारांनी आपल्या गाडीचा ताफा थांबवला.
Ajit Pawar In Baramati : बारामतीत अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या गाडीचा ताफा थांबवत अपघातग्रस्तांची मदत केली. त्याचं झालं असं की, दुपारी सव्वा बाराच्या माळेगावचा पोलिस दलाचा कार्यक्रम आटपून अजित पवार बारामतीच्या दिशेनं निघालेले. ताफा बारामतीच्या दिशेने निघाला आणि अचानक माळेगाव कॉलनी नजीक समोरच एक अपघात घडल्याचा अजित पवारांच्या नजरेस पडला. तात्काळ अजित पवारांनी आपल्या गाडीचा ताफा थांबवला.
लगेच अपघातग्रस्तांना उचलण्याची व्यवस्था केली. ताफ्यातील एका गाडीत या अपघातग्रस्तांना दिली आणि बारामतीतील डॉक्टरांना देखील तातडीने सूचना केली. एवढ्यावर न थांबता काही वेळानंतर एका ठिकाणचे उद्घाटन उरकल्यानंतर पुन्हा दादांनी त्या अपघातग्रस्त त्यांची विचारपूस केली.
आज सकाळी सहा वाजल्यापासून बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विविध ठिकाणच्या पाहणी, उद्घाटन, भेटी व भूमीपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दुपारपर्यंत तब्बल 15 ठिकाणी त्यांनी भेट दिली. या दरम्यान दुपारी अकरा वाजता माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमास अजितदादा यांनी उपस्थिती दाखवली.
माळेगावचा हा कार्यक्रम आटोपून बारामतीतील एका शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवार हे बारामतीकडे निघाले होते, त्याचवेळी त्यांच्या वाहनांचा ताफा शारदानगर नजीक आला असता माळेगाव कॉलनी येथे बारामती नीरा रस्त्यावर एका वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची सूचना केली.
यानंतर बारामतीचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या वाहनात लोकांना बसण्याची व्यवस्था करून त्या अपघातग्रस्तांना त्या वाहनातून बारामतीतील गिरीराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली. त्यानंतर बारामतीतील गिरिराज हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर रमेश भोईटे यांच्याशी संपर्क साधला व त्या अपघातग्रस्तांवर उपचार करण्याची सूचना केली. त्यानंतर काही वेळातच जेव्हा ते बारामती पोहोचले. तेव्हा शोरूमच्या उद्घाटनानंतर अजित पवार यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना या रुग्णांच्या प्रकृती संदर्भात विचारणा केली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha