एक्स्प्लोर

Ajit Pawar Death Plane Crash: अजितदादांच्या जवळच्या व्यक्तीची चार तास CID चौकशी, अपघाताच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं? तपासाला वेग

Ajit Pawar Death Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सीआयडीने चौकशीला गती दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी (Ajit Pawar Death Plane Crash) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशीला गती दिली असून, या प्रकरणात त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या बारामती (Baramati) दौऱ्याचे नियोजन कोणी केले होते, तसेच या दौऱ्याबाबत आदल्या दिवशी नेमकी कोणती चर्चा झाली होती, यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सीआयडी अधिकारी माहिती घेत असल्याचे समजते.

मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले अजित पवार यांचे खासगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ कोसळले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, अपघातामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असून, त्यानुसार सीआयडीकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: चार तासांहून अधिक काळ चौकशी

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची चौकशी केली असून, ही चौकशी चार तासांहून अधिक काळ सुरू होती. या चौकशीत अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजीच्या बारामती दौऱ्याचे संपूर्ण नियोजन, प्रवासाचे तपशील, 27 जानेवारी रात्री झालेल्या चर्चा, तसेच दौऱ्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर प्रश्न विचारण्यात आले. मिळालेल्या उत्तरांच्या आधारे अपघातास तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा अन्य कोणती कारणे जबाबदार आहेत का, याचा अंदाज बांधण्यात येणार आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: तीन टप्प्यांमध्ये केला जाणार अपघाताचा तपास

दरम्यान, राज्यातील काही राजकीय नेत्यांनी या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केल्याने, त्या अनुषंगानेही सीआयडी अधिकारी विविध शक्यतांचा तपास करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही चौकशी केवळ तांत्रिक बाबींपुरती मर्यादित न राहता, सर्व अंगांनी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनाचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, तसेच पायलटमधील संवाद यासारखी तांत्रिक माहिती संकलित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्यांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. यामध्ये विमान जमिनीवर आदळल्यानंतर झालेला परिणाम, विमानाला आग कधी व कशी लागली, तसेच विमानाच्या सांगाड्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवली जाणार आहे.

आणखी वाचा 

Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
Manoj Jarange Patil: सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget