एक्स्प्लोर
निवडणुकीत नागराज मंजुळेंसारखं दिग्दर्शन कराः अजित पवार

करमाळा (सोलापूर) : नागराज मंजुळेंनी 'सैराट'चं जसं यशस्वी दिग्दर्शन केलं, तसंच यशस्वी दिग्दर्शन आगामी निवडणुकीत करा, असा सल्ला राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. नगरपालिका निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची सुरुवात करमाळ्यातून केली. यावेळी झालेल्या भाषणात अजित पवारांनी 'सैराट'चं आणि नागराज मंजुळेंचं कौतुक केलं.
पूर्वी 50 लाखांत आमदार फुटायचा, आता नगरसेवकही फुटत नाही : अजित पवार
'सैराट'ने करमाळ्याला नवी ओळख दिली आहे. समाजातील काही गोष्टींसाठी अनेकांनी सैराटला जबाबदार धरलं. मात्र हा सिनेमा आहे. तो मनोरंजनासाठी बघायचा असतो, असंही अजित पवार म्हणाले. सध्याचं सरकार बुवाबाजीच्या नादाला लागलं असल्याचं सांगत अजित पवारांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं. राजसत्ता चुकली तर धर्मसत्ता त्यावर अंकुश ठेवते, असं वक्तव्य करणारे मुख्यमंत्री बुवाबाजीच्या पायावर राज्य ठेवत आहेत, असा घणाघातही अजित पवारांनी केला.Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















