एक्स्प्लोर
अजित पवार आणि सुनील तटकरे आज नेवाळीतील ग्रामस्थांची भेट घेणार
कल्याण : कल्याणच्या नेवाळीमध्ये जाऊन राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे ग्रामस्थांची भेट घेतील. आज संध्याकाळी सहा वाजता दोघेही नेते नेवाळीतील परिस्थितीचा आढावा घेतील. नेवाळीत होणाऱ्या विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात नेवाळीसह शेजारील गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं.
याआधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवाळीतील आंदोलनात जखमी झालेल्या ग्रामस्थांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. तर नेवाळी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दखल घेतली होती. दिल्लीत या संदर्भातील संबंधित विभागाची बैठक बोलावत प्रकरणाची सर्व माहिती त्यांनी मागवली होती.
नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या होत्या.
काय आहे प्रकरण?
ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धावेळी लष्कराने नेवाळी गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली. याला या शेतकऱ्यांनी विरोध केला. जवळपास या भागातील 7 ते 8 गावांची जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.
नेवाळीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. यामध्ये 12 आंदोलक जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement