एक्स्प्लोर

'गृहमंत्रीपद पाहिजे होतं पण वरिष्ठांनी...'; अजित पवारांनी मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली 

Ajit Pawar: अजित पवार म्हणाले की, जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटलं. अनिल देशमुखांनंतर मला गृहमंत्रीपद द्या म्हटलं पण दिलं नाही, वळसे पाटलांना दिलं,असं अजित पवारांनी म्हटलं.  

Ajit Pawar On Home Ministry:  राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या बेधडक आणि थेट बोलण्यामुळं चर्चेत असतात. आता त्यांनी एक अशीच थेट आणि स्पष्ट इच्छा बोलून दाखवली आहे. राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याला हवं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाषण केलं.

कुणीतरी मंचावर बसलेल्या नेत्यानं आता सरकार आलं की तुम्ही गृहमंत्री व्हा? असं अजित पवारांना म्हटलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, मागे उपमुख्यमंत्रीपद दिलं त्यावेळी मी वरिष्ठांना म्हटलं की मला गृहखातं द्या. पण वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही,असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. 

अजित पवार म्हणाले की, मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. त्यात राष्ट्रवादीचा जरी कुणी म्हणत आला 'दादा, पोटात घ्या', तरी पोटात नाही ओठात नाही. सगळ्यांना नियम सारखाच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी जीवाचं रान करुन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पण तोच जर चुकलेला असेल तर मी पांघरुण कसं घालणार. पांघरुण घालून घालून पांघरुणं संपायची वेळ येईल. 

अजित पवार म्हणाले, पहिल्यांदा अनिलरावांना (अनिल देशमुख) दिलं ते गेलं. म्हणलं आता तरी द्या. तरी दिलं नाही. ते दिलीपरावांकडे (दिलीप वळसे पाटील) गेलं. आता काय करणार. वरिष्ठांनी केल्यावर काही बोलता येत नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

काँग्रेस, भाजप अन् शिवसेना या तिन्ही पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री होण्याचा मान

अजित पवार हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांनी 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र काही तासांचंच हे सरकार ठरलं. नंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं. यात देखील अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. सोबत वित्त मंत्रालयाचीही जबाबदारी मिळाली. ठाकरे सरकारच्या काळात गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनिल देशमुखांकडे होती. त्यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांचं मंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar : नियोजित कार्यक्रम अडीच तास उशिरा, अजित पवार ताटकळत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री न पोहोचल्याने मंत्रालयातून बाहेर

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget