Air Pollution : दिवाळीत फटाके फोडू नका, मास्क वापरा! वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर
Health Department Guidelines For Air Pollution : गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
Air Pollution : एकीकडे थंडी (Winter) ची चाहूल लागली आहे, मात्र दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता (Air Quality) खालवत चालली आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. राज्यातील 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वायू प्रदूषणात वाढ, राज्य सरकार सतर्क
राज्यातील मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचं आवाहन दिलं आहे. राज्य सरकारने नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वूमीवर राज्य सरकारच्या खबरदारीच्या सूचना
- मास्क वापरण्याला प्राधान्य द्या.
- मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालणं टाळा.
- सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे खिडक्या उघडू नका.
- दुपारी 12 ते 4 बाहेर पडण्याचा सल्ला
- लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा.
- दिवाळीत फटाके फोडणं टाळण्याचा सरकारचा सल्ला
मुंबईसह राज्याची हवा बिघडली
राज्यातील काही शहरातील हवेची गुणवत्ता (Air Quality) पातळी खालावली आहे. राज्यातील काही शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Level) मध्यम (Moderate) ते वाईट (Bad) श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी समोर आली आहे.
'या' शहरांसाठी आरोग्य विभागाची नियमावली
- मुंबई
- नाशिक
- अमरावती
- सांगली
- सोलापूर
- जळगाव
- जालना
- कोल्हापूर
- लातूर
- अकोला
- बदलापूर
- उल्हासनगर
- औरंगाबाद
- पुणे
- नागपूर
- चंद्रपूर
- नवी मुंबई