एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी फरार
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरुच आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडीमध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सोळा वर्षांच्या मुलानं चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. जामखेड पोलिस स्थानकात अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी 25 जानेवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पीडित चिमुरडी घराजवळ खेळताना त्याने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, शनिवारी आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement