एक्स्प्लोर
कुठे काय बोलावं याची मला जाण: धनंजय मुंडे
अहमदनगर : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही. माझ्याही शरीरात मुंड्यांचं रक्त असून कुठे काय बोलावं हे आई-वडिलांनी मला शिकवलं आहे, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी पंकजांना दिलं. अहमदनगरला पाथर्डीत ते संत वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहाच्या समारोपात बोलत होते.
पंकजा मुंडेंनी धार्मिक व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंसह विरोधकांवर जहरी टीका केली होती. रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाचं नातं मोठं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी पौराणिक कथांचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर टीका केली होती.
मी तोंड उघडलं, तर आरोप करणाऱ्यांची पळता भुई थोडी होईल: पंकजा मुंडे
त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, "धार्मिक व्यासपीठावर राजकीय भाष्य करणार नाही. माझ्या शरीरात वामनभाऊ, भगवान बाबांचं आणि मुंड्यांचं रक्त आहे. त्यामुळे कुठल्या वेळेला काय आणि कुठे बोलावं हे आई वडिलांनी शिकवलं आहे." तसंच गोपीनाथ मुंडे मोठे व्हावेत, यासाठी आमचे वडीलही चंदनासारखे झिजले असं सांगत उसतोड कामगारांच्या वेदना मला अधिक कळतात, असही धनंजय मुंडे म्हणाले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement