एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं
पारनेर तालुक्यातील निघोज इथे ही घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये 'सैराट' चित्रपटातील कथेची पुनरावृत्ती झाली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जावयावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पारनेर तालुक्यातील निघोज इथे ही घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत.
VIDEO | मुंबई : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहनासाठी दाम्पत्यापैकी एकाला सरकारी नोकरीत प्राधान्य
रुक्मिणी रणसिंग असं मुलीचं नावं असून जावयाचं नाव मंगेश रणसिंग आहे. मंगेश आणि रुक्मिणी यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. पण हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या माहेरच्यांनी रागातून रुक्मिणीला तिच्या पतीसह अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं.
लग्नानंतर सहा महिन्यांनी मुलगी माहेरी राहायला आली होती. तिचा नवरा भेटण्यासाठी तिथे आला होता. मात्र यावेळी मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी मंगेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुक्मिणी त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली असता, तिघांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. दोघांना उपचारांसाठी पुण्याती ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला तर जावयावर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement