धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका उसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे.
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका उसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिशिंगणापूर जवळील हनुमानवाडी इथं घडली आहे. रंगनाथ पंढरीनाथ शेटे ( वय 75 ) असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
गेल्या पाच दिवसांपासून रंगनाथ शेटे बेपत्ता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून रंगनाथ शेटे बेपत्ता होते. उसाच्या शेतात उग्र वास येवू लागल्याने स्थानिकांनी शोधाशोध केली. यावेळी उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला की अजून काय? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिकांनी वनविभाग तसेच पोलिसांना माहिती कळवली आहे. पोलिस आणि वनविभागाकडून अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी परिसरात धक्कादायक घटना, पतीनं संपवलं जीवन
छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी परिसरात पती-पत्नीतील वादातून 22 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पवन ज्ञानेश्वर भुते वय 22 असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन याचे लग्न सुमारे सहा महिन्यांपूर्वी झाले होते. घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. या वादातून मानसिक तणाव वाढल्याने पवनने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चुकीच्या साईडने गाडी आणली याचा जाब विचारला म्हणून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना कुर्ल्यात घडली आहे. मनीष सरोदे हा तरुण दुचाकीने कुर्ला एलबीएस मार्गावरून जात होता. या वेळी विष्णू गुप्ता नावाच्या आरोपीने समोरून उलट्या दिशेने दुचाकी आणली. उलट्या बाजूने का आला याचा जाब विचारलं असता या आरोपीने त्याच्याकडील चाकूने या तरुणाला तब्बल सहा वार केले. त्याच्या मानेत चाकू घुसवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणी व्हीबी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परप्रांतीयने मराठी तरुणावर केला हल्ला, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, जखमी अवस्थेतील मनीषला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी व्हीबी नगर पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत. विनाकारण एक परप्रांतीयने अशा प्रकारे मराठी तरुणावर हल्ला केलाय त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनीष च्या नातेवाईकांनी केली आहे.
घटनेच्या वेळी शेजारी राहणाऱ्या भावाने खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी धाव घेऊन आतून बंद असलेला दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या






















