एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचे 'ते' 18 नगरसेवक बडतर्फ, जिल्हाध्यक्षांनाही पदावरून काढले
पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

मुंबई : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे तर जिल्हाध्यक्षांना अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावळण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली.
तर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणती कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा केला नसल्याने जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या कारवाईत म्हटले आहे.अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी केली आहे. pic.twitter.com/y7BwjlqYQQ
— NCP (@NCPspeaks) January 12, 2019
राष्ट्रवादीचे बडतर्फ नगरसेवक 1) सागर बोरुडे 2) मीनाक्षी चव्हाण 3) दीपाली बारस्कर 4) संपत बारस्कार 5) विनीत पाउलबुद्धे 6) सुनील त्रंबके 7) खान समद वहाब 8) ज्याती गाडे 9) शोभा बोरकर 10) कुमार वाकळे 11) रुपाली पारगे 12) अविनाश घुले 13) गणेश भोसले 14) परवीन कुरेशी 15) शेख नजीर अहमद 16) प्रकाश भागानगरे 17) शीतल जगताप 18) मीना चोपडाअहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग होत असताना त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल अहमदनगर शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी दिले आहे. pic.twitter.com/GtKinPOo6A
— NCP (@NCPspeaks) January 12, 2019
भाजपासोबत गेलेल्या नगरसेवकांवर 5 दिवसात कारवाई : शरद पवार
भाजपाला कोणत्याही परिस्थिती पाठिंबा द्यायचा नाही, हे मी आधीच स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही भाजपाला पाठिंबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्षांचा आदेश नाकारणाऱ्यांना नोटीस पाठवली असून येत्या 5 दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे 30 डिसेंबर रोजी बोलताना दिली होती. पक्षादेश नाकारणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या लोकांनी भाजपला पाठींबा दिला, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले होते. नगर महापालिका निवडणुकीनंतर इथले आमदार मला भेटायला आले होते. त्यावेळी मी त्यांनी मला संपूर्ण परिस्थिती सांगितली. तसेच शिवसेनेबाबतही मला त्यांनी सांगितले. मी त्यांना त्याचवेळी आपण वेगळा विचार करू. पण कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जायचे नाही, हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही भाजपाला पाठिंबा दिल्याचे मला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. येत्या चार ते पाच दिवसांत पक्षाची बैठक होईल. त्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. पक्षादेश न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले होते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावलला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले होते. त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये? असे स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. संबंधित बातम्याअहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला?
अहमदनगर महापौर निवडणूक : बसपच्या 4 नगरसेवकांचं निलंबन
नगरसेवकाच्या कृत्याने राष्ट्रवादीला लाज | स्पेशल रिपोर्ट | अहमदनगर/मुंबई | एबीपी माझा
भाजपला पाठिंबा का दिला हे पक्षापुढे मांडणार : संग्राम जगताप | अहमदनगर | एबीपी माझा
महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युती- संग्राम जगताप | अहमदनगर | एबीपी माझा
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं नगर महापालिका भाजपकडे | अहमदनगर | एबीपी माझा
भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई : जयंत पाटील | अहमदनगर | एबीपी माझा
अहमदनगर महापालिकेत अखेर भाजपचाच महापौर | एबीपी माझा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























