एक्स्प्लोर
विखे पाटलांच्या वाढदिवसाला पोलिसांकडून पोस्टर, कारवाईची मागणी
अहमदनगरः विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांनी दैनिकात जाहिरात दिल्यानं वादंग उठलं आहे. नगर जिल्हा पोलीस आणि लोणी पोलीस ठाण्याच्या वतीनं ही जाहिरात देण्यात आली आहे. काही दैनिकांनी विखे-पाटील यांची अभिष्टचिंतन वाढदिवस विशेष पुरवणी काढली आहे.
जाहिरातीमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पगार यांची छबी झळकवत आहे. जाहिरातीत सुसंस्कृत व्यक्तिमत्व लोकसेवेतून निर्माण झालेला कर्तबगार नेता, असा उल्लेखही करण्यात आला आहे.
याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते श्याम असावा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. पोलीस दलानं औचित्यभंग केल्यानं कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement