एक्स्प्लोर
सांगलीत वकिलाची आईसह आत्महत्या, आईचा मृतदेह कृष्णा नदीत तर मुलाचा रेल्वे रुळावर सापडला
मिरजेतील वकील सुनील अग्रवाल (वय 47 वर्ष) आणि त्यांची आई पुष्पा अग्रवाल (वय 70) या दोघा आई-मुलाचा काल (2 मे) मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. मिरजेतील ब्राह्मणपुरीमध्ये राहणारे हे दोघेजण 30 एप्रिलपासून बेपत्ता होते.

सांगली : सांगलीच्या मिरज शहरातील एका वकिलाने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील अग्रवाल आणि पुष्पा अग्रवाल असं आत्महत्या केलेल्या आई-मुलाचं नाव आहे. आईचा मृतदेह कृष्णा नदीत तर मुलाचा रेल्वे रुळावर मृतदेह सापडला. मिरजेतील वकील सुनील अग्रवाल (वय 47 वर्ष) आणि त्यांची आई पुष्पा अग्रवाल (वय 70) या दोघा आई-मुलाचा काल (2 मे) मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. मिरजेतील ब्राह्मणपुरीमध्ये राहणारे हे दोघेजण 30 एप्रिलपासून बेपत्ता होते. 1 मे रोजी मिरजेच्या कृष्णा घाट स्मशानभूमीजवळ वकील चिन्ह असलेली अॅक्सेस मोटार सायकल बेवारस अवस्थेत नागरिकांना आढळली. त्याच्या शेजारी महिलेची चप्पलही होती. त्यावरुन महिलेने आत्महत्या केली आहे का अशी शंका आली. गांधी चौकी पोलिसांना याची माहिती देऊन या नंबरची दुचाकी कोणाची आहे याचा शोध सुरु केला. त्याचबरोबर नदीच्या पात्रातही शोध घेतल्यानंतर दुपारी महिलेचा मृतदेह तरंगत दिसला. हा मृतदेह पुष्पा अग्रवाल यांचा असल्याचं स्पष्ट झालं. तर काल सकाळी कृष्णा घाट रोडवरील रेल्वे रुळावर सुनील अग्रवाल यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात आणि गांधी चौकी पोलिसात दोघांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. मात्र आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकलेलं नाही. आई आणि मुलाच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे मिरजेत हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी वाचा























