एक्स्प्लोर
विधानपरिषद निवडणूक : कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?
विधानपरिषदेच्या 52 उमेदवारांपैकी 51 उमेदवारांचा अहवाल समोर आला आहे. उमेदवारांनी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार गंभीर माहिती पुढे आली आहे.
![विधानपरिषद निवडणूक : कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार? ADR report on criminal background candidates for Vidhan Parishad election विधानपरिषद निवडणूक : कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/17123826/All-Party-And-Leader.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारांची माहिती उजेडात आणणारा एडीआरचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात अनेक उमेदवारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विधानपरिषदेच्या 52 उमेदवारांपैकी 51 उमेदवारांचा अहवाल समोर आला आहे. उमेदवारांनी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार गंभीर माहिती पुढे आली आहे.
शिवसेनेचे तिन्ही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
एकूण 8 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यापैकी शिवसेनेच्या तिन्ही तर भाजपच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
सर्वाधिक संपत्ती अपक्ष उमेदवाराची
तर 51 पैकी 23 उमेदवार कोट्याधीश असून सर्वाधिक संपत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रताप सोनावणे यांची आहे. प्रताप सोनावणे यांच्याकडे 58 कोटींची संपत्ती आहे. सोनावणे यांच्या खालोखाल भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा नंबर लागतो. डावखरेंकडे 35 कोटींची संपत्ती आहे.
तसंच शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन उमेदवार कोट्यधीश असल्याचं अहवालात नमूद केलं आहे.
25 जूनला विधानपरिषदेची निवडणूक
25 जूनला महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक आहे. मुंबईत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 25 जूनला मतदान होणार आहे. कोकणात पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे, तर नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
विधानपरिषद उमेदवारांची ख्याती
52 पैकी 51 उमेदवारांचा रिपोर्ट जारी
8 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
शिवसेनेचे तीनही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
भाजपचे 2 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या विरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद
एकूण 51 पैकी 23 उमेदवार हे कोट्याधीश आहेत
शिवसेना आणि भाजपचे 3 उमेदवार कोट्याधीश
सर्वाधिक संपत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रताप सोनावणेंची
प्रताप सोनावणे यांच्याकडे 58 कोटींची संपत्ती
त्या खालोखाल निरंजन डावखरेंकडे 35 कोटींची संपत्ती
![विधानपरिषद निवडणूक : कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/21161338/Criminal_Cases.jpg)
![विधानपरिषद निवडणूक : कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/21161514/Highest_Proper.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)