एक्स्प्लोर

खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. सातत्याने पाठपुरावा करुन देखील प्रशासनाकडून पाण्याची समस्या सुटत नसल्याचे पाहून खडसे यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला होता. खडसेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी उपोषणाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांसह गुरा-ढोरांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे मोठा रोष जनतेमध्ये पाहायला मिळत होता. सत्ताधारी पक्षाच्या जेष्ठ नेत्याच्या मतदारसंघातच ही पाणी टंचाई होत असल्याने विविध चर्चा आणि तर्कवितर्क जनतेमध्ये लढवले जात होते. खडसे यांच्यासह गावा-गावातील पुढारी पाणी प्रश्नावर सरकार दरबारी पाठपुरावा करून देखील पिण्याच्या पाण्याची समस्या काही केल्या सुटत नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पूर्वसनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर पाणी प्रश्न दोन दिवसात न सुटल्यास आपल्याला उपोषण करावे लागेल, असा इशारा दिला होता. खडसे यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याने हा इशारा दिल्याने संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. खडसे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या. वीजमंडळाने खंडीत केलेला वीजपुरवठा जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरळीत झाल्याने येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांवर खडसे समाधानी झाल्याने त्यांनी दिलेला उपोषणाचा इशारा आता तात्पुरता तरी स्थगित झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याशिवाय आपले पूर्ण समाधान होणार नाही, अशी भूमिका देखील खडसे यांनी यावेळी मांडली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात पाणी प्रश्न पेटला असतानाच बोदवड पंचायत समिती सभापतींनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाणीप्रश मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना त्यांनी समस्या समजून न घेता थेट बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे खडसेंचे नाराज कार्यकर्ते पाणी प्रश्न सुटावा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कृत्याचा निषेध करावा, यासाठी बोदवड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते. पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनानंतर आणि मुख्याधिकाऱ्यांना समजावण्यात येईल, असे आश्वासन देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे खडसे यांच्यासह उपोषण स्थळी गेले होते. कार्यकर्ते आणि खडसे यांचे समाधान झाल्याने हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget