Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष, आदित्य ठाकरेंचे राज्यपाल बैस यांना पत्र, कारवाईचीही केली मागणी
Aaditya Thackeray : राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहित ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी केलीये.
![Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष, आदित्य ठाकरेंचे राज्यपाल बैस यांना पत्र, कारवाईचीही केली मागणी Aditya Thackeray wrote a letter to Governor Rames Bais demanding action on CM Eknath Shinde detail marathi News Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष, आदित्य ठाकरेंचे राज्यपाल बैस यांना पत्र, कारवाईचीही केली मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/5c9540cb3078d991c01c6091aa4c8e701681282312262359_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरु असलेला अनागोंदी कारभार आणि त्यामुळे महाराष्ट्राचे होणारे अपिरमीत नुकसान याबाबत राज्यपलांनी हस्तक्षेप करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलीये. यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मुंबईशी निगडीत अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर सुरु असलेल्या सावळ्यागोंधळाची कारणमिमांसाही त्यांनी राज्यपालांकडे या पत्राद्वारे मांडली आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न हे प्रलंबित असल्याचं चित्र सध्या आहे. त्याचसाठी ठाकरे गटाकडून राज्यपाल बैस यांना पत्र लिहिण्यात आलय.
दरम्यान मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात देखील आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल देखील केलाय. तर या पत्राद्वारे राज्यपाल बैस यांना पत्र लिहून आदित्य ठाकरेंनी कारवाईची देखील मागणी केलीये. बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असले तरी राज्याचे मुख्यमंत्री असलेले महोदय स्वत: च्या ताब्यात ठेवलेल्या आणि लोकांच्या सेवेसाठी असलेल्या नगरविकास विभागाच्या मुख्य कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी लिहिलेल्या या पत्रावर राज्यपाल कोणती कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
आदित्य ठाकरेंनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई महानगरपालिकेच्या विविध घोटाळ्यांचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी या पत्रात केलाय. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सध्या सत्तेत असलेल्या असंवैधानिक सरकारने केलेले घोटाळे, त्यात रस्ते घोटाळा, रस्त्यावरील फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, किंवा सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा यावर वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. या घोटाळ्यांची लोकायुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी करून तुमचं लक्ष वेधल्यावर प्रशासनाला ध्यानाला आले असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पाठवलेल्या पत्रात म्हटलंय.
दरम्यान आदित्य ठाकरेंनी मुंबई मेट्रो, वरळीतील डिलाईट रोड पुल, मुंबई ट्रान्स हॅबर लिंक प्रकल्प, बेस्ट बस यावरून देखील मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधलाय. या सगळ्या कामांचा देखील उल्लेख आदित्य ठाकरेंनी या पत्रात केलाय. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई पालिकेतील कर्मचारी आणि बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत देखील या पत्रात काही मुद्दे मांडले आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)