एक्स्प्लोर
Advertisement
आर्ची आली रे आली, बारावीच्या परीक्षेसाठी रिंकूच्या परीक्षा केंद्रावर चाहत्यांची गर्दी
सैराटची आर्चीची आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली. यावेळी तिची एक झलक पाहण्यासाठी टेंभूर्णी येथील परीक्षा केंद्रासमोर चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.
पंढरपूर : आजपासून 12 वीची परीक्षा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. सैराट चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील आज बारावीची परीक्षा देण्यासाठी तिच्या परीक्षा केंद्रावर दाखल झाली.
रिंकूकडून बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
सैराटच्या आर्चीची आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली. यावेळी तिची एक झलक पाहण्यासाठी टेंभूर्णी येथील परीक्षा केंद्रासमोर चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.
रिंकू बाह्य विद्यार्थी म्हणून टेंभूर्णी येथील तुळजाभवानी कला व वाणिज्य विद्यालयातून बारावी कला शाखेची परीक्षा देण्यासाठी आपल्या आईवडीलांसह दाखल झाली.
परीक्षेसाठी आलेल्या आर्चीला पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शाळा व्यवस्थापनाने आधीच टेंभूर्णी पोलिसांकडे अधिकच पोलीस बंदोबस्त मागविल्याने चाहत्यांचा त्रास रिंकूसह परीक्षार्थी विद्यार्थ्यांना जाणवला नाही. यावेळी रिंकूने राज्यभरातील बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
भारत
जळगाव
Advertisement