एक्स्प्लोर

तक्रारदार महिलेला ताटकळत ठेवलं, पोलीस निरीक्षकावर कारवाई

उस्मानाबादमधील या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून पोलीस निरीक्षकाची उलबांगडी करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : शिक्षणाधिकाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनी 18 तास ताटकळत बसवून ठेवलं. उस्मानाबादमधील या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून पोलीस निरीक्षकाची उलबांगडी करण्यात आली आहे. शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला 10 एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला 18 तास ताटकळत बसवून ठेवलं आणि गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. काय आहे प्रकरण? वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याची तक्रार देण्यासाठी महिला उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनला गेली होती. ही महिला शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. तपास अधिकारी दिवसभरात बदलत राहिले. शेवटी या महिलेने रात्री अडीच वाजता पोलीस मदत केंद्राला फोन केला. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी कंटाळून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ही महिला निघून गेली. सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत महिलेला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं गेलं. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. या महिलेच्या मूळ तक्रारीवर तब्बल पाच दिवसांनंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर संबंधितांवर आज कारवाई करण्यात आली. संबंधित बातमी :

विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी महिलेला 18 तास बसवून ठेवलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget