एक्स्प्लोर
अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मरेपर्यंत मारहाण
अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जमादाराला आरोपीने लाकडी दांड्याने तोंडावर जबर मारहाण केली. यामध्ये पोलीस जमादाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
यवतमाळ : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जमादाराला आरोपीने लाकडी दांड्याने तोंडावर जबर मारहाण केली. आरोपीने या मारहाणीत पोलीस जमादाराला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. राजेंद्र कुलमेथे असे मृत पोलीस जमादाराचे नाव असून त्यांच्यासोबतचे इतर दोन पोलीस हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव अनिल आत्राम असे आहे.
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे काल रात्री 12.30 वाजता ही घटना घडली आहे. पोलिसांना मारून आरोपी पसार झाला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. जखमी पोलिसांना मारेगाव च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आत्राम एका प्रकरणात वारंवार तारखेवर उपस्थित राहत नव्हता. त्यामुळे तीन पोलिसांचे पथक हिवरी गावात आत्रामला अटक करण्यासाठी वॉरंट घेऊन गेले होते. तेव्हा अत्रामने लाकडी दांड्याचा वापर करत पोलिसांवर हल्ला केला. त्यात एक पोलीस ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement