एक्स्प्लोर
नगरमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
अहमदनगर : अहमदनगर-दौंड रस्त्यावर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगरमधून दौंडला जाणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक बसल्यानं अपघात झाला आहे. दुचाकी विरुद्ध दिशेनं काष्टी वरुन डोकराई फाट्याच्या दिशेनं चालली होती. एसटीची धडक इतकी भयानक होती की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये एका पुरुषाचा समावेश असून सर्व मृत कर्जत तालुक्यातील रहिवासी आहेत. या अपघातानंतर बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement