एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह 11 जण दोषी, मात्र मोक्का हटवला
मुंबई : औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणात 22 पैकी 11 जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदालचा समावेश आहे. मात्र यासोबतच सर्व दोषींवरील मोक्का हटवण्या आला आहे. विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला. उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
काय आहे हे प्रकरण?
महाराष्ट्र एटीएसने 8 मे 2006 रोजी टाटा सुमो आणि इंडिका कारचा पाठलाग करुन औरंगाबादमधील वेरुळ इथे तीन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 30 किलो आरडीएक्स, 10 एके-47 रायफल आणि 3200 गोळ्या जप्त केल्या होत्या. मात्र इंडिका कार चालवत असलेला अबू जुंदाल पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.
या प्रकरणी एटीएसने अबू जुंदालसह 22 जणांना अटक केली होती. विशेष मोक्का न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये 22 जणांविरुद्ध आरोप ठेवले होते. सुनावणी दरम्यान सरकारच्या वतीने 100 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी 16 जणांच्या साक्षी नोंदवल्या.
या प्रकरणाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज 22 पैकी 11 जणांना दोषी ठरवलं. उद्याच्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement