एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 जानेवारी 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना, जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करुन तरुणीचा विनयभंग, पाच आरोपी ताब्यात तर आणखी दोघांचा शोध सुरु https://bit.ly/31aLGK8
- 2012 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींना उद्या फाशी नाही, दिल्लीच्या पटियाला कोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती https://bit.ly/38U3RGM
- कोरेगाव भीमा चौकशी आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचा माजी न्यायमूर्ती पटेलांचा आरोप https://bit.ly/3b253JV
- दोन लाखांपेक्षा जास्तच्या कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती तर लवकरच राज्यातील 60 ते 70 हजार पदं भरणार असल्याची घोषणा https://bit.ly/37Iy8Iw
- संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, केंद्रीय अर्थमंत्री उद्या 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार https://bit.ly/2RJey9h
- देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप सुरु, वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीसाठी संप, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं, दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा https://bit.ly/31cHCcp
- करोना व्हायरसचा धोका असलेल्या चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरुप, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती, चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु https://bit.ly/319AwWf
- सिग्नलवर सतत हॉर्न वाजवणाऱ्यांना मुंबई पोलिसांचा दणका, सिग्नलवरील डेसिबल मीटरमुळे जितका हॉर्न वाजवणार तितका जास्त वेळ खोळंबा, पोलिसांच्या भन्नाट आयडियाचं कौतुक https://bit.ly/2OfzzpQ
- ठाण्याच्या सिग्नलवर शिकणारी मुलं थेट इस्रोला जाणार, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावल्याने इस्रोमध्ये संधी https://bit.ly/2OdXaY0
- टीम इंडियाचा सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी, मालिकेत 4-0 अशी आघाडी https://bit.ly/2RKaA0c
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement