एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2019 | सोमवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2019 | सोमवार
1. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दिल्लीत उद्या दुसरा अंक, सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण, उद्या साडेदहा वाजता निर्णय https://bit.ly/2Dg1Erq
2. कथित जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दिलासा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 9 फाईल्स बंद, परंतु या फाईल अजित पवारांशी सबंधित नसल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा खुलासा https://bit.ly/34hyBiV
3. देवेंद्र फडणवीस - अजित पवार यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ, राज्यपालांनी कोणतीही तारीख दिली नसल्याचा भाजपचा दावा https://bit.ly/2KTbIL0
4. अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कराडमध्ये प्रितीसंगमावर स्पष्टीकरण https://bit.ly/2qzUZ8S
5. अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत, त्यांनी काढलेला व्हिप आमदारांना लागू होणार, रावसाहेब दानवेंचा दावा https://bit.ly/2OB1Ari तर सत्तेची वाट पाहणाऱ्या संजय राऊतांना वेड लागल्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा दानवेंचा सल्ला https://bit.ly/2KS4uap
6. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न, विधानभवनात साडेचार तास बैठक, सकारात्मक गोष्ट घडेल अशी आशा, छगन भुजबळांची प्रतिक्रिया https://bit.ly/2DaXUaG
7. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडून कामकाजाला सुरुवात, पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री सहायता निधीच्या धनादेशावर पहिली स्वाक्षरी https://bit.ly/35pHhUK
8. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचं टीकास्त्र, सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांचं संसदेबाहेर आंदोलन https://bit.ly/2OHaGmH
9. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण, ट्विटर प्रोफाईलवरील काँग्रेसचा उल्लेख हटवला, मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरीच्या अफवा https://bit.ly/2OLCPZC
10. अभिनेत्री कंगना राणावत अयोध्येतील राम मंदिरावर आधारीत चित्रपट साकारणार, चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण https://bit.ly/37zXyIp
याआधी इतर राज्यात बहुमत सिद्ध करताना कोर्टाने काय निर्णय दिले होते? https://bit.ly/2DfPKO8
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement