एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/06/2018
- लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे संकेत, कोअर कमिटी आणि मित्रपक्षांशी चर्चा करुन योग्यवेळी निर्णय https://goo.gl/mfHnHp
- घटस्फोटित महिलेच्या मुलीला आईची जात, अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय, राज्यभरातील घटस्फोटित, परित्यक्तांच्या अपत्यांना मोठा दिलासा https://goo.gl/846yW4
- पावसाळी अधिवेशनापूर्वी आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा https://goo.gl/bZczSb
- शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/Pwn1Mv
- आयएएस अधिकाऱ्यांच्या असहकारावरुन केजरीवालांचं 8 दिवसांपासून उपोषण सुरुच, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर शिवसेनेचाही केजरीवालांना पाठिंबा https://goo.gl/opK2yP
- काश्मीरमध्ये अपहरणानंतर हत्या करण्यात आलेल्या शहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येचा बदला; लष्कराने 4 दहशवाद्यांना यमसदनी धाडलं, शस्त्रसंधी संपल्यानंतर पहिलीच कारवाई https://goo.gl/1FgpeY
- सीडीआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार क्राईम ब्रांचच्या जाळ्यात, आरोपी सौरव साहू दिल्लीतून ठाणे क्राईम ब्रांचच्या अटकेत http://abpmajha.abplive.in/
- गौरी लंकेश यांची हत्या करणारा परशुराम वाघमारे समोर आल्यास मी ओळखेन, कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा दावा http://abpmajha.abplive.in/
- कॉलर उडवायला अक्कल लागत नाही, मी खलनायक असेन तर उदयनराजे प्रेम चोप्रा, आमदार शिवेंद्रराजेंचा हल्लाबोल https://goo.gl/pdkZQM
- मुंबईतील मालाड स्टेशनवर तरुणाने सुसाट लोकलसमोर स्वत:ला झोकून दिलं, प्रवाशाचा जागीच मृत्यू, प्रकार सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/5JMUni
- 20 रुपयाचा वाद जीवावर बेतला, पुण्यात रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या https://goo.gl/t2eFP9
- उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकावर पदाधिकाऱ्यांकडूनच प्राणघातक हल्ला, राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/LukoQE
- खऱ्या बंदुकीला खेळण्यातली बंदूक समजून चिमुकलीचा आईवर गोळीबार, कोलकात्यामधील धक्कादायक प्रकार, मुलीची आई गंभीर जखमी https://goo.gl/Ye8166
- मी चुकून कचरा टाकला, पण अनुष्काच्या तोंडातून कचरा बाहेर पडला त्याचं काय? कचरा फेकणाऱ्याची उफराटी फेसबुक पोस्ट, तरुणाच्या आईचाही विराट-अनुष्कावर पलटवार https://goo.gl/VwuWWP
- येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, तरीही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा सरकारचा सल्ला https://goo.gl/u6oPoe
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement