एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 जानेवारी 2019 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 जानेवारी 2019 | गुरुवार 1. राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीची पुन्हा नवी तारीख, 29 जानेवारीला नवीन घटनापीठापुठे सुनावणी, मुस्लीम पक्षकारांच्या आक्षेपानंतर न्यायमूर्ती उदय लळित घटनापीठातून बाहेर https://goo.gl/sJWJgC 2. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच, संपाबाबत तोडगा निघाला नाही तर विद्युत पुरवठा कर्मचारीही आज संध्याकाळपासून संपावर जाणार, मुंबईकरांची बत्ती गुल होण्याची शक्यता https://goo.gl/Jdjs2a 3. जीएसटीत सूट मिळण्याच्या मर्यादेत वाढ, वार्षिक उत्पन्न 40 लाखांपर्यंत असणाऱ्यांना जीएसटीमधून सूट https://goo.gl/M2CW3B 4. खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांच्या 10% आरक्षणाला युथ फॉर इक्वॅलिटी या संस्थेचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान, आरक्षणामुळे संविधानाच्या तत्त्वांना तडे जात असल्याच्या दावा https://goo.gl/RP8GSX 5. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा हायकोर्टात याचिकेद्वारे दावा, मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सरांटेंच्या याचिकेवर 21 जानेवारीला सुनावणी https://goo.gl/QwAjtK 6. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनाचा मान विधवा शेतकरी पत्नीला मिळण्याची शक्यता, उद्घाटकाचे नाव अद्याप निश्चित नाही, उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत https://goo.gl/FMH5QE 7. बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची मागणी, नामकरण न केल्यास आंदोलनाचा इशारा https://goo.gl/rtYWoB 8. रायगड आणि पाचाड येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रेला सुरुवात, तर नागपुरातून काँग्रेसची पाचव्या टप्प्यातली जनसंघर्ष यात्रा सुरु https://goo.gl/wK8VEr 9. 'व्हर्जिनिटी टेस्ट' अवैज्ञानिक, एमबीबीएसच्या द्वितीय वर्षातील न्यायवैद्यक शास्त्र विषयात शिकवला जाणारा धडा अभ्यासक्रमातून वगळा, कुप्रथांविरोधात सेवाग्रामचे डॉ. इंद्रजित खांडेकरांचा लढा https://goo.gl/DbU88U 10. बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकसाठी 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यास कंगना राणावतचा नकार, 25 जानेवारीला 'ठाकरे' आणि 'मणिकर्णिका' क्लॅश होणार https://goo.gl/E8tKhB यवतमाळ साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला अभिव्यक्ती संमेलन रात्री 9 वाजता यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
आणखी वाचा























