एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/07/2018
- मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा https://goo.gl/eJjL9v
- मनसेच्या आंदोलनाला अखेर यश, मल्टिप्लेक्स चालक राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर, खाद्यपदार्थांचे दर 50 रुपयांवर आणण्याचं आश्वासन https://goo.gl/uBsEkD
- अहमदनगरमधील केडगावच्या शिवसैनिक हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जामीन मंजूर https://goo.gl/qsvtF7
- 16 जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा, तर दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचा सवाल https://goo.gl/Bz4Jn5
- गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे मोबाईल जप्त करा, रस्ते सुरक्षिततेसाठी उत्तराखंड हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/vUDMdY
- कोकणात रत्नागिरीसह रायगडमध्ये मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली https://goo.gl/2b2CWJ
- मुंबईजवळील वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले, पाण्याचा प्रवाह वाढल्याने बचावकार्यात अडथळे, 35 जण सुखरूप तर 5 जण बेपत्ता https://goo.gl/2b2CWJ
- विदर्भातही मुसळधार पावसाची हजेरी, नागपूरमध्ये पावसाने 24 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा https://goo.gl/Qp8eCh
- मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत दरम्यान रेल्वेसेवा सकाळपासून ठप्प, अनेक रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलला https://goo.gl/2593F2
- मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनकडे गुड न्यूज, मादी पेंग्विनने अंडं दिलं, लवकरच नवा सदस्य जन्मणार https://goo.gl/ijFJys
- नवी मुंबईच्या कामोठ्यातील व्यावसायिकाच्या हत्येचं गूढ उकललं, प्रेयसीला पळवल्याच्या रागातून जीव घेतल्याचं उघड https://goo.gl/HvmRFw
- मुंबईत उद्या रविवारी तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, मध्यरेल्वेवर विद्याविहार-भायखळा, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-गोरेगाव आणि हार्बर मार्गावर कुर्ला-वाशीदरम्यान मेगाब्लॉक https://goo.gl/DdPSro
- संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून मार्गस्थ, तर संत तुकारामांची पालखी आज पुण्यातल्या नाना पेठेत मुक्कामी, वारकरी भक्तिनामात दंग https://goo.gl/dwaBgj
- रामदास आठवलेंच्या आयुष्यावर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नागराज मंजुळे दिग्दर्शन करण्याची शक्यता https://goo.gl/jf4DKn
- विश्वचषकाच्या रणांगणात आज उपांत्यपूर्व फेरीच्या अंतिम दोन लढाया; स्वीडनसमोर इंग्लंडचं आव्हान, तर यजमान रशिया भिडणार क्रोएशियाशी https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement