एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार*
- भाजपच्या चौथ्या यादीत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कापला, तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनाही संधी नाही, एकनाथ खडसेंऐवजी कन्या रोहिणी यांना उमेदवारी https://bit.ly/2AIAQi8
- भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, घाटकोपरमधून प्रकाश मेहतांचं तिकीट कापल्यानंतर समर्थक आक्रमक, भाजप उमेदवार पराग शाहांची गाडी फोडली, बोरीवलीत सुनील राणेंविरोधातही घोषणाबाजी https://bit.ly/2VdKva7
- नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवारांचं शक्तिप्रदर्शन, तर येवल्यातून छगन भुजबळांचा, लोणीमधून राधाकृष्ण विखे पाटलांचा अर्ज दाखल https://bit.ly/30LRKa4
- बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, गोपीचंद पडळकरांवर रॅली टाळून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ https://bit.ly/31WgPRr
- मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी खासदार संजय दिना पाटील शिवसेनेत प्रवेश करणार https://bit.ly/30L3J83
- बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकलेचं आदित्य ठाकरेंना आव्हान, वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर साताऱ्यात उदयनराजेंविरोधात बिचुकलेची पत्नी लढणार https://bit.ly/30MEXo1
- शिवरायांबाबत अक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, बहुजन समाजवादी पक्षाकडून अहमदनगरमधून उमेदवारी https://bit.ly/32XfLfY
- आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, विरोधातील सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, तर याचिकाकर्त्या शिवसैनिकाला 50 हजारांचा दंड https://bit.ly/2VdKqTR
- बडगाममधील Mi-17 विमानाचा अपघात आमच्याच चुकीमुळे, हवाई दल प्रमुखांची कबुली, वार्षिक पत्रकार परिषदेत बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रमोशनल व्हिडीओही जारी https://bit.ly/2InEbaK
- विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेचं टीम इंडियाला जोरदार प्रत्युत्तर, तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 385 धावा, डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉकची दमदार शतकं https://bit.ly/30Hfk8d
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
सोलापूर
पुणे
Advertisement