एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018
- दिल्लीतील सत्ताधारी 'आप'ला धक्का, 20 आमदारांचं सदस्यत्व अखेर रद्द, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी https://goo.gl/nktp8f
- कमला मिल आगीप्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर खोटा अहवाल दिल्याचा ठपका, एका अधिकाऱ्यासह कमला मिलचा संचालक आणि हुक्का पार्लरच्या मालकाला अटक https://goo.gl/oqAENa
- सांगलीत तासगाव शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थिनीचा गळफास, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/N2Sbj1
- बस थांबवली नाही तर फोन कर, 91 वर्षीय आमदार गणपतराव देशमुखांचं विद्यार्थिनीच्या पत्राला उत्तर https://goo.gl/hgEQLL
- बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या दोषीला फाशी, मध्य प्रदेशनंतर हरियाणा सरकारचं क्रांतिकारी पाऊल https://goo.gl/6TfA3T
- इथिओपियाच्या सॉलोमन डेकसिसा आणि अमाने गोबेनाला मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद, गोपी थोनाकल आणि सुधा सिंग भारतीय धावपटूंमध्ये अव्वल https://goo.gl/dajL16
- दहा दिवसात मुंबईसह उपनगरासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश https://goo.gl/FMqEds
- हरियाणात बारावीतील विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची गोळ्या झाडून हत्या, अनुपस्थितीबद्दल ओरडल्याचा राग https://goo.gl/25US3U
- प्रवीण तोगडियांना विहिपच्या अध्यक्षपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता, मोदी सरकारवर टीका भोवणार, विहिंप नेत्याचा दावा https://gl/ygMgpP
- आधार लिंक नसल्याने आधार प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापकांचंच सिम कार्ड बंद, दूरसंचार कंपन्यांच्या मुजोरीवर नाराजी, कर्नाटकातील प्रकार https://goo.gl/2McCgf
- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हॉटेलात दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू, 41 परदेशी नागरिकांसह 126 जणांची सुटका, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/hjJKVW
- ट्रम्प सरकारचं शटडाऊन, अमेरिकेतील 80 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ https://goo.gl/JCsvif
- प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉन, फ्लिपकार्टवर बंपर सेल, गॅझेट्स, कपड्यांवर 80 टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट https://goo.gl/XbDnYu
- 'पद्मावत'च्या अडचणी कायम, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थान सरकारही सुप्रीम कोर्टात जाणार, करणी सेनेचा 25 जानेवारीला 'भारत बंद'चा नारा https://t.co/fdeS3ObXU7
- तिसऱ्या कसोटीत विराट कोहली चूक सुधारणार, अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता, नेटमध्ये कर्णधार आणि उपकर्णधाराचा कसून सराव https://goo.gl/huu5tf
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement