एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

- सुशांत सिंह आमहत्या प्रकरणावरुन मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा नवा सामना, मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील नेते सरसावले, सीबीआयकडे तपास देण्यास जाहीर विरोध https://bit.ly/3kgOrTA
- सुशांतसिंह आत्महत्येचा तपास योग्य दिशेने, बिहार पोलिसांनी ही केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करायला हवी होती, मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3gpmGFY
- सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासासाठी बिहारहून मुंबईत दाखल झालेले IPS अधिकारी बिनय तिवारी महापालिकेकडून 14 दिवस क्वॉरन्टाईन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आगपाखड https://bit.ly/2XmdUkE
- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या तपासावरुन अमृता फडणवीस उद्विग्न.. मुंबईने माणुसकी गमावल्याची खंत, राहण्यासाठी सुरक्षित नसल्याची भावना https://bit.ly/3kas42a तर, विश्वास नसेल तर मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडून द्या; वरुण सरदेसाई अन् प्रियंका चतुर्वेदी यांचे आव्हान https://bit.ly/2Xp9olj
- राममंदिर भूमीपूजन सोहळ्याचा आज गणपती पूजनानं श्रीगणेशा, आता प्रतीक्षा 5 ऑगस्टच्या भूमिपूजन सोहळ्याची https://bit.ly/3k7VU7m
- आजपर्यंत रामाची मूर्ती चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली.. 'अयोध्या राममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात', शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींची नवी मागणी https://bit.ly/2Xmphsy
- अयोध्येत कारसेवकांच्या मनातलं भव्य मंदिर साकारलं जात नाही, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात शिवसेनाप्रमुखांसोबत गुन्हा दाखल झालेल्या शिवसैनिक संतोष दुबे यांची खंत https://bit.ly/2XmphZA
- भिवंडीत मैत्रिणीकडून परतणाऱ्या महिलेवर शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार, चौघांना बेड्या https://bit.ly/2D539MM
- दुबईत 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आयपीएलचा पहिला सामना, बीसीसीआयचं शिक्कामोर्तब https://bit.ly/30oTVU4
- एसटीसमोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आगाराच्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल https://bit.ly/33rFwJ3
आणखी वाचा























