एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2020 | शुक्रवार
- यूपीएससीच्या स्पर्धापरीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर, नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणारhttps://bit.ly/2Y2fiIF
- सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस उपस्थिती अनिवार्य, राज्य सरकारचा निर्णय, हजर न राहिल्यास आठवडाभर गैरहजेरी लागणार https://bit.ly/30e7Z3c
- निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटींची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, अलिबागमध्ये नुकसानाची पाहणी https://bit.ly/375yjxK
- राज्यात आजपासून पुनश्च हरिओम, मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिकमध्ये व्यवहार सुरु https://bit.ly/3eZfm2R तर नागपूरमध्ये सम-विषम तारखेला दिशांनुसार दुकानं उघडणार https://bit.ly/2Udgjwm
- छेडछाडीच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची रुग्णालयातील कर्मचाऱ्यासोबत मारहाण, बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना https://bit.ly/2A85J2X
- देशभरात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात जवळपास दहा हजार नवे रुग्ण, तर 273 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/375mGaj तर जगभरात एका दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 67 लाखांजवळ https://bit.ly/3gWioGC
- मुंबईमध्ये 97 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, सात दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज https://bit.ly/30dhgbY
- गर्भवती हत्तीण हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक, केरळ वन विभागाची कारवाई; स्फोटकांनी भरलेलं फळ खायला दिल्याने हत्तीणीचा मृत्यू https://bit.ly/2zU3nER
- संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सांगलीत प्रशासनाची तयारी, कृष्णा नदीने 20 फुटाची पातळी ओलांडताच पूर पट्ट्यातील नागरिकांना सक्तीने स्थलांतरीत करणार https://bit.ly/3eQvi7k
- सिंधुदुर्गाच्या गवदेवमध्ये पुरुषांची वटपौर्णिमा, पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा, तर भावी पत्नीसाठी अविवाहितांच्या वडाला फेऱ्या https://bit.ly/2A7ZEDs
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement