ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. अंबानींच्या घराबाहेर गाडी दिसल्यावर पहिल्यांदा एफीआय सचिन वाझे सर्वात आधी पोहोचले, सर्व घटनाक्रम शंका निर्माण करणारा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी
2. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू; मुंब्रा खाडीत सापडला मृतदेह https://bit.ly/2PtlOYc
3. सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पलटवार; विधानसभेत मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यावरुन खडाजंगी https://bit.ly/2PsVnBU
4. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर, राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका, स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट https://bit.ly/3ea8CSv
5. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने जिल्हा परिषद, पंचायतीच्या आरक्षणाचं गणित बदलणार; 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची ताकीद, विदर्भातल्या काही जिल्ह्यात काही जागांवर पुन्हा निवडणूकही घ्यावी लागणार https://bit.ly/3kOl1wG
6. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं OBC आरक्षण अडचणीत https://bit.ly/3kOar8R ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती https://bit.ly/38dcZIw
7. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'मास्कद्वेष'! नाशिकमध्येही विना मास्क, स्वागताला आलेल्या माजी महापौरांना म्हणाले 'मास्क काढा' https://bit.ly/30f8MzJ
8. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा लवकरच भाजप प्रवेश; 7 मार्चला पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये उपस्थित राहणार https://bit.ly/3qhliJK
9. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एनसीबीचे 30 हजार पानाचं आरोपपत्र दाखल, आरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 33 जणांचा समावेश https://bit.ly/3c6kcev
10. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 7 बाद 294 धावा, ऋषभ पंतचं दमदार शतक https://bit.ly/3c1vCAt
ABP माझा ब्लॉग :
BLOG | लसवंत व्हा! : संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2OkxgF3
ABP माझा स्पेशल :
कोरोना व इतर विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी देशातील पहिल्या 'विषाणू रक्षक' आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती https://bit.ly/3kMaIJo
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 'फिरते तारांगण' प्रकल्पाचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3kMuTHf
'संभालो मुझको ओ मेरे यारो!' फारुख अब्दुल्ला आणि अमरिंदर सिंह यांचं शानदार नृत्य, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3rmFc7j
मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये पाच पट वाढ केल्यानंतर रेल्वेकडून सर्वच स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात तिप्पट वाढ.. 10 रुपयाचं प्लॅटफॉर्म तिकीट आता 30 रुपयांना https://bit.ly/3sSNbcA
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv