एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2020 | सोमवार
- मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय अपेक्षित, सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या समोर राज्य सरकारचा तिसरा अर्ज दाखल https://bit.ly/34MipsS
- मराठा आरक्षण संघर्ष आणि समन्वय समितीच्या वतीने साताऱ्यात गोलमेज परिषद, पानिपतच्या लढाईचा दाखला देत शिवेंद्रराजेंकडून एक होण्याचं आवाहन, छत्रपती उदयनराजेंची मात्र यावेळीही अनुपस्थिती https://bit.ly/2GqdGDS
- वैद्यकीय शाखेतील प्रवेश सुरु होणार, आरक्षणापासून वंचित मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार सरकार उचलणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची घोषणा https://bit.ly/2TIMKC3
- 'ससून' आणि जेजेसह राज्यातील सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी https://bit.ly/3mOp5gh
- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी, तरीही राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, दिवाळीनंतर लग्न समारंभात नागरिकांची संख्या आणि मंदिरांबाबत निर्णय होण्याची शक्यता https://bit.ly/3oIWI4V
- आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू; विद्यार्थी पालक समन्वय समितीच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सरकारला इशारा https://bit.ly/35OOfnS
- 'बेस्ट' सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, जेवणातही अळ्या; रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन.. दुपारी बेस्टच्या कुर्ला डेपोतही जेवणात अळ्या सापडल्याने कर्मचाऱ्याचं कामबंद आंदोलन https://bit.ly/3oRkxHy
- मुंबईकरांसाठी दिलासा, आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी, 1916 या क्रमांकावर संपर्क केल्यावर जवळच्या केंद्राची माहिती मिळणार https://bit.ly/34O4X7A
- राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मंडप आणि समारंभ डेकोरेशन व्यावसायिकांचं आंदोलन.. उत्सव समारंभातील गर्दीचं बंधन हटवण्याची मागणी https://bit.ly/2HPw5L4
- आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने, दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शेवटची संधी https://bit.ly/382ggv2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement