एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली, सायबर सेलचा अहवाल https://bit.ly/36C3eUn मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदनामीप्रकरणी दोन गुन्हे दाखल! https://bit.ly/3jBJsvU
- सुशांत प्रकरणी आमचा तपास खरा होता, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समाधान, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://bit.ly/30FEQ0a महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी https://bit.ly/3nhdW8N
- व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस, अनोळखी फ्रेन्डशिप पुण्यातील तरुणांना महागात; फसवणूक झालेल्या तरुणांची सायबर सेलमध्ये धाव https://bit.ly/3llyyL0
- राज्यात 30 सप्टेंबरपासून दररोजच्या नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, मृत्यूदरही कमी झाल्याचा दिलासा; आजच्या रुग्णसंख्येची प्रतीक्षा https://bit.ly/33zbFOa देशभरातही नवीन कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण घटलं https://bit.ly/30DIAzi
- लॉकडाऊन लागू झाल्यापासून बंद असलेली सिनेमा हॉल सुरु होण्याचा मुहूर्त निश्चित, 15 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेसह सिनेमा हॉल सुरु करायला परवानगी, महाराष्ट्र सरकारही सकारात्मक https://bit.ly/3lfKjTm
- हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू झाले, ग्रथालयं सुरू करण्यास नेमका अडथळा काय? ग्रंथालयांचा विजनवास कधी संपणार? https://bit.ly/3nxuB8e नियमावली जारी करुन ग्रंथालयं सुरु करा; ग्रंथपाल, वाचनप्रेमी, विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/3lgjA9i
- सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षात शीतयुद्ध! कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याच्या अमित देशमुखांच्या मागणीवर विनायक राऊत संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/3d5BTuN
- ब्रिटीश शास्त्रज्ञ रॉजर पेनरोस यांना कृष्णविवराच्या संशोधनासाठी तर जर्मनीच्या रेनहार्ड गेन्जेल आणि अमेरिकेच्या अँड्रिया गेज यांना आकाशगंगेतील सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टच्या संशोधनासाठी भौतिकशास्त्राचं नोबेल https://bit.ly/3nxt5D4
- मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत पुन्हा गोंधळ, परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकलली, विद्यापीठ परिसरात गोंधळाच वातावरण https://bit.ly/2HUY2R6
- आयपीएलमध्ये आज मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान, 2018 साली आयपीएल पुनरागमनानंतर राजस्थानचं मुंबईवर वर्चस्व, गेल्या चारही सामन्यात राजस्थानची मुंबईवर मात https://bit.ly/2HTHkS6
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
शिक्षण
Advertisement