एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2020 | गुरूवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2020 | गुरूवार
1. एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांची जामीनावर सुटका, वांद्रे सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर
2. देशात 24 तासात 941 नवीन रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती तर महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3 हजारांपेक्षा जास्त, 12 तासात राज्यात 165 रुग्णांची भर, मुंबईत, सोलापूर आणि पालघरमध्ये रुग्ण वाढले
3. वांद्रे गर्दी प्रकरणातील पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, ज्येष्ठ पत्रकारांची मागणी
4. महाराष्ट्र सरकार चुकलं, राहुल कुलकर्णींची अटक अयोग्य, ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांचं वक्तव्य
5. लॉकडाऊन पॉझ बटण कोरोनावरील उपाय नाही, टेस्टिंग वाढवण्याची गरज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सल्ला, जीएसटीचा पैसा राज्यांना तातडीने देण्याचं आवाहन
6.मुंबईत कोरोना व्हायरसचं 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नाही, बीएमसीच्या 'फिव्हर क्लिनिक'च्या आकडेवारीवरून स्पष्ट
7. काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय, लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अभिनेता सलमान खान भडकला
8. एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेणार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
9.झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप वापरणं सुरक्षित नाही, गृहमंत्रालयाच्या सूचना, अॅपमुळे खासगी माहिती लीक होत असल्याच्या तक्रारी
10. पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 100 नागरिकांवर गुन्हे, बिबवेवाडी, कोंढवा, हडपसरमध्ये कारवाई, सांगलीच्या मिरजमध्ये कोलांटी उड्या मारण्याची शिक्षा
BLOG | इगोच्या राजकारणात पत्रकाराला बळीचा बकरा बनवू नका, संदीप रामदासी यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement