एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2020 | सोमवार
- गावी जाण्याची सोय होत नसल्याने सूरतमध्ये परप्रांतीय मजुरांचा गोंधळ, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या https://bit.ly/2WoaMDB
- पुण्याच्या वारजेतील मजूर अड्ड्यावर परप्रांतीयांची गर्दी, परतण्यासाठीची नाव नोंदणी करताना मजुरांचा गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज https://bit.ly/2VZ94JN
- महाराष्ट्रातून गेलेल्या मजुरांना घेण्यास उत्तर प्रदेश सरकारची आडकाठी, नवाब मलिक यांचा यूपी सरकारवर आरोप, लाखो मजुरांची चाचणी करणं अशक्य असल्याचाही दावा https://bit.ly/2KWyWj7
- विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावं जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे उमेदवार, 21 मे रोजी होणार विधानपरिषद निवडणूक https://bit.ly/2SBgelr
- महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागांच्या नव्या भरतीवर बंदी https://bit.ly/3figwax
- देशात 24 तासात 72 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजारांवर https://bit.ly/3b0Eow6 अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या अकरा लाख 88 हजारांवर https://bit.ly/2z42RTY
- पुण्यात सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू, राज्यात आतापर्यंत चार पोलिसांचा कोरोनाने घेतला बळी https://bit.ly/2WnIdWN पुण्यातील कोरोनाबाधितांवर लोणावळ्यातील समुद्र इन्स्टिट्यूटमध्ये उपचार, हॉस्टेल ताब्यात घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश https://bit.ly/2WobDnI
- राज्यातील काही जिल्ह्यात दारू खरेदीसाठी मद्यपींच्या रांगा, नाशिकमध्ये दारू दुकानं सुरु होण्याआधीच गर्दी, तर कोल्हापुरात दुकानाबाहेर पिशव्यांनी जागा अडवण्याचा प्रयत्न https://bit.ly/3c2bhK3
- यूपीएससीची 31 मे रोजी होणारी पूर्वपरीक्षा लांबणीवर, जेईई आणि नीट परीक्षांची तारीख उद्या घोषित होणार, तर सीएच्या परीक्षा 29 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत घेण्याचा निर्णय https://bit.ly/2zXDXFV
- घरी परतणाऱ्या मजुरांबाबत सोनिया गांधींची मोठी घोषणा, काँग्रेस रेल्वे तिकीटाचा संपूर्ण खर्च उचलणार https://bit.ly/2LanKQd
आणखी वाचा























