ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2021 | गुरुवार
- खूशखबर! यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, 1 जूनला मान्सूनचं केरळात आगमन होण्याची शक्यता, 10 जूनपर्यंत तळकोकणात तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापणार https://bit.ly/3xRpnJt
- 'मुंबईकडून काहीतरी शिका' दिल्लीच्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला, BMCचंही केलं कौतुक https://bit.ly/2SkRsbN
- पुण्यासारख्या रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार करावा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना https://bit.ly/2PS7c5c
- राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा, अ आणि ब वर्गातील 4 हजार तर क आणि ड मधील 12 हजार पदांच्या भरतीचे आदेश लवकरच निघणार https://bit.ly/3xLQEND
- राज्य सरकार 18 ते 44 वयोगटासाठीची कोरोना लस 45 वर्षांवरील नागरिकांना देण्याची शक्यता, अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस मिळत नसल्यामुळे राज्य सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार https://bit.ly/3vMvuNg
- रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांचा सुळसुळाट, नागपुरात ICU मधील अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचं इंजेक्शन टोचलं, सुदैवाने रुग्ण ठणठणीत https://bit.ly/3vIK6NO
- उल्हासनगरमधील असुरक्षितरित्या स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण : स्टिक पुरवणाऱ्या मनीष केशवानी विरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3uoJkVP
- राज्यात बुधवारी 57,640 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान https://bit.ly/3xRpwfZ सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी, गेल्या 24 तासांत 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3esNcjn
- कोरोना लसींचे स्वामित्व अधिकार खुले करण्यास बायडेन प्रशासनाची मंजुरी, जागतिक लसीकरणाला मिळणार गती https://bit.ly/3f0xLh1 'रोश'च्या अँटीबॉडी कॉकटेलला भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी https://bit.ly/2SxSqSf
- राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन, 20 एप्रिल रोजी झालेली कोरोनाची लागण https://bit.ly/2QPNt6Z
ABP माझा स्पेशल
छत्रपती शाहू महाराजांचं 120 वर्षापूर्वीचं आपत्ती व्यवस्थापन; वैद्यकीय सुविधा नसतानाही कसा केला प्लेगच्या साथीचा सामना? https://bit.ly/3xSLtvi
1001 कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसुती; नायर रुग्णालयाच्या कामगिरीचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक https://bit.ly/3eQyOQA
Covid 19 vaccination : मुंबईकरांना दिलासा! सोसायटीमध्येच राबवता येणार कोरोना लसीकरण मोहिम https://bit.ly/3truzQO
COVID-19 vaccination centre : WhatsApp द्वारे शोधा घराजवळील लसीकरण केंद्र, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? https://bit.ly/2SrcBRH
Coronavirus : लातुरात महादान मोहिमेत गरजूंना मदत करणारे अदृश्य हात; कोरोना महामारीतही तरुणांनी जपली माणुसकी https://bit.ly/3nQKMxQ
Coronavirus : भारतातील कोरोनाची लाट मे अखेरीस ओसरण्याची शक्यता, विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांचं मत https://bit.ly/3uobsbS
सावधान! महामार्गावर प्रवाशांना अॅपच्या मदतीने लुटणारी टोळी सक्रिय, महाराष्ट्र पोलीसांचं सावधगिरीचं आवाहन https://bit.ly/2SkRHnd
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv