एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2020 | गुरूवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 128 वर, 24 तासात 23 नवे रुग्ण, मुंबईत कोरोनाचा चौथा बळी, तर पुणे-मुंबईत 18 जण कोरोनामुक्त
2. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची मोठी घोषणा, गरिबांसाठी 5 किलो रेशन तीन महिने मोफत तर उज्ज्वला योजनेद्वारे 3 महिने सिलेंडरही मोफत मिळणार
3. भारतात अजूनतरी कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली, सरकारचे प्रयत्न पाण्यात घालवू नका, डॉ. रमण गंगाखेडकर यांचं आवाहन, संपूर्ण मुलाखत पाहा रात्री 8 वाजता एबीपी माझावर
4. डॉक्टर, पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा तर डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार
5. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका, संचारबंदीमुळं उत्तरपत्रिका शाळेतच अडकल्या, निकाल वेळेत लागण्याची शक्यता कमी
6. लॉकडाऊनमध्ये औषधं घरपोच करण्याचा पुणे केमिस्ट असोसिएशनचा निर्णय तर उपासमारीची वेळ आलेल्या लोकांसाठी मुंबई, नागपुरात मदतीचा हात
7. नवी मुंबई एपीएमसी मार्केट खुलं, सॅनिटायझरनं गाड्या स्वच्छ तर कामगारांना मास्क बंधनकारक, नागपुरात भाजी घेण्यासाठी सॅनिटायझरनं हात धुण्याची सक्ती
8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा तर घोषणेनंतरही वाशी, मुलुंड टोलनाक्यांवर टोलवसुली
9. संचारबंदीमुळे पायपीट करण्याची वेळ, गुजरातमध्ये कामासाठी गेलेल्यांची मुलाबाळांसह पालघरकडे वाट तर यवतमाळमध्ये कंटेनरमधून ३०० जणांचा प्रवास
10.कोरोनासोबतच अवकाळी पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान, द्राक्षबागांना खरेदीदारही मिळेना तर नाशिक, हिंगोली, वर्धा परिसरात अवकाळीचा फटका
Special Report - 'कोरोना किलर मशीन' कसं काम करते?; 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क'चे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांची मुलाखत
BLOG - BLOG | स्वतंत्र कोरोना रुग्णालय ठरणार वरदान!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement