ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2025 | शनिवार
1) राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, बाहेरुन येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका https://tinyurl.com/mr3f8dua तुम्ही अर्बन नक्षल आहात का? अटक करुन दाखवाच, जनसुरक्षा कायद्यावरुन राज ठाकरेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/3yjzxejr तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर अटक होणारच, मनराज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं थेट प्रत्युत्तर https://tinyurl.com/4retpbze
2) भ्रष्टाचारी तेतुका मेळावावा भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, माणिकराव कोकाटेंनांही काढला चिमटा https://tinyurl.com/55pzbxv8 एकमेकांवर आरोप करुन महाराष्ट्र अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरुन मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सवाल https://tinyurl.com/322nude2
3) उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही https://tinyurl.com/bdc7nwfp पुण्यातील MIDC मध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/tz68ncc4
4) दहशतवाद हा दहशतवाद आहे त्याला धर्माचे लेबल लावू नका, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी वरच्या न्यायालयात दाद मागायला हवी, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य, https://tinyurl.com/ywz72vf6 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथ यांना अडकवण्याचा कट होता, प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा दावा
https://tinyurl.com/muwxwdxa
5) सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करुन परत सरळ करणारे लक्षात राहतात; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य https://tinyurl.com/y76enubv लोकांची कामं केली तरच लोक आठवण ठेवतात असं दत्तात्रय भरणेंना म्हणायचं असेल, मंत्री छगन भुजबळांनी सांगितला भरणेंच्या वक्तव्याचा अर्थ https://tinyurl.com/3sf64jbz
6) नांदणीमधील माधुरी हत्तीणीला तातडीने पाठवतो असं वनताराचे CEO म्हणालेत का? आमदार सतेज पाटलांचा सवाल, लाखो जणांनी स्वाक्षरी करत दिला पाठिंबा https://tinyurl.com/59c9tsck कोल्हापुरातून जाताना माधुरी हत्तीण रडली, हत्तीला रडू आलं तर तो दु:खी असतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/ywnnnx5m
7) कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेप, लैंगिक शोषणासह बलात्कार प्रकरणात दोषी https://tinyurl.com/ynfthasb अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जन केल्यानंतर मृत पत्नी परतली, कोल्हापुरातील जिल्ह्यात चक्रावणारी घटना https://tinyurl.com/3ymna77s सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/bdzxjccn
8) आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, तुमच्या आजोबांकडे इतकी संपत्ती कुठून आली? माजी आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना सवाल https://tinyurl.com/yeyk9sa7 साखर घोटाळ्याविरोधात माजी आमदार राजेंद्र राऊतांची ईडीकडे तक्रार, आमदार दिलीप सोपलांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/4vrknu4f पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जारी, 9.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ, 20 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग https://tinyurl.com/5n848335
9) Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप https://tinyurl.com/5e3t7jzm मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार कलाभवन नवसचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, चित्रपटसृष्टीत खळबळ https://tinyurl.com/3shk56tx ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांची मगरपट्ट्याजवळ मोठी डील, पुण्यातील फ्लॅट 6.15 कोटी रुपयांना विकला, 42 टक्के फायदा https://tinyurl.com/4nhjy389
10) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या चार बाद 191 धावा, यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप यांच्यात शतकी भागीदारी, इंग्लंडवर 168 धावांची आघाडी, ओव्हलची लढत रोचक वळणावर https://tinyurl.com/46ca4wa8 ईस्ट झोनने दुलीप ट्रॉफी 2025 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा, इशान किशन कर्णधार, विराट, शमी, आकाशदीपसह दिग्गजांना मिळाली संधी https://tinyurl.com/4w4wxwzv
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w






















